12 दुचाकी सहित 2 आरोपी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई...


.

वरोरा... जगदीश पेंदाम
 
सतत होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना निर्देश दिले होते..
स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्या 12 दुचाकी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानंतर महेश कोंडावार यांनी विशेष पथक नेमत दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू केली.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार शेगाव येथील चारगाव बु. येथे आढळले, रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे 33 वर्षीय राजू बालाजी धुर्वे रा. अर्जुनी कोकेवाडा, वरोरा व 31 वर्षीय प्रशांत उर्फ भोला कवडुजी गाते शिवाजी नगर भद्रावती यांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी अनेक दुचाकी चोरीच्या घटनेची कबुली दिली...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]