ट्रक व ऑटोचा भिषण अपघात; 3 जण जगीच ठार 3 गंभीर जखमी ◾ट्रक खाली ऑटो चिरडल्या गेल्याने 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू ट्रक उलटल्याने झाला अपघात
चंद्रपूर - बल्लारपूर बायपास मार्गावर बेनार रेल्वे पुलाजवळ ट्रकने आपले नियंत्रण गमावल्यामुळे रस्त्याचा कडेला पलटी झाला त्याच वेळी प्रवासाची भरलेला एक ऑटोवर ट्रक पलटला असता. या झालेल्या भीषण अपघातात तीणांचा मृत्यू झाला. तर तीन जखमी आहे. ही दुर्दैवी घटना रात्री 7:30  वाजताच्या सुमारास घडली.


मृतक मध्ये अनुष्का खेरकर 22 वर्ष रा. बल्लारपूर, संगीता चाहांदे 56 वर्ष रा. गडचिरोली, ऑटो चालक  इरफान खान वय 49 वर्ष रा. बाबूपेठ यांचा समावेश आहे. 


जखमीमध्ये राजकला मोहूरले॔ वय 34 वर्ष रा. बाबुपेठ, गीता शेंडे वय 50 वर्ष रा. तुकुम , दशरथ बोबडे वय 50 वर्ष रा. वणी यांचा समावेश आहे.

चंद्रपुर शहरातील बेनार रेल्वे पुल गोंदिया कडे जाणाऱ्या मार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान भिषण अपघात झाला असुन भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक क्रमांक MH 34 M 1817 च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. नेमक्या त्याच वेडी शेजारून जाणारा एक ऑटो क्रमांक MH 34 D 8064 ट्रक खाली चिरडला गेल्याने ऑटोतील तीन प्रवाशी जागीत ठार झाले तर तीन लोकांना गंभीर दुखापत झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघाताची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असुन जखमी प्रवाशांना उपाचाराठी शासकीय रुग्णालय दाखल केले आहे. बातमी लिहेपर्यंत पोलीस कारवाई सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]