विजेचा धक्का लागून 4 मेंढ्यांचा मृत्यू - महावितरणच्या लापरवाहीमुळे आठवड्याभरात दोन घटना...

विजेचा धक्का लागून 4 मेंढ्यांचा मृत्यू - महावितरणच्या लापरवाहीमुळे आठवड्याभरात दोन घटना...
सावली - सावली शहरातील विद्यानगर लोकवस्तीत विजेच्या तारेचा स्पर्श झाल्यामुळे आठवड्याभरात घडलेल्या दोन घटनेत दोन मेंढया, दोन बकऱ्याचा मृत्यू झाला. या घटनेस महावितरण कंपनीचा लापरवाही असल्याचे दिसून आले आहे.
     सावली नगरपंचायत अंतर्गत पंचायत समिती परिसरातील विद्यानगर या लोकवस्तीत 6 सप्टेंबर ला नामदेव गरकावार रा. खेडी या मेंढपाळाने आपल्या मेंढया चरावयास नेले. परंतु सायंकाळी मेंढया आढळून न आल्याने शोधाशोध केली असता दुसऱ्या दिवशी दुपारी विजेच्या तारेला लटकून 2 मेंढया, एक बकरा मृत अवस्थेत आढळल्या यामुळे मेंढपाळाचे तीस हजार रुपयाचे आर्थिक नुकसान झाले. याबाबत प्रभारी उपकार्यकारी अभियंता महाडोळे मॅडम यांनी मौका चौकशी केली. मात्र सदर विजेचा सप्लाय कुठून झालेला आहे याबाबत गंभीरता न दाखवता याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यामुळे आठवड्यातच त्याच ठिकाणी मारोती कवडू ओगुवार रा. खेडी हे मेंढया चारत असताना विजेचा करंट लागून एक बकरा मरण पावला. यामुळे मेंढपाळाचे दहा हजार रुपयाचे नुकसान झाले.
     या घटना लोकवस्तीला लागून असल्याने मनुष्यहानी होण्याची शक्यता असताना महाविरण विभागाचे दुर्लक्ष झाल्याने विभागाप्रती माजी पंचायत समिती सभापती विजय कोरेवार व विद्यानगरवासी रोष व्यक्त करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]