जादूटोणा विरोधी कायदा राज्यव्यापी जनसंवाद यात्रा 5 ते 6 सप्टेंबरला चंद्रपूर जिल्ह्यात.....5 सप्टेंबरला भद्रावती पोलीस स्टेशन,प्रशासन व
शिंदे महाविद्यालयात साधणार प्राध्यापक व विद्यार्थ्यांची संवाद...

वरोरा... जगदीश पेंदाम

महाराष्ट्रात नरबळी इतर अमानुष्य ,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायदा 2013 अर्थात जादूटोणाविरोधी कायदा या नावाने जास्त ओळखले जाते. या कायद्याला 10 वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्याने डॉ. नरेंद्र दाभोळकर संस्थापक अध्यक्ष यांच्या प्रेरणास्त्रोत असलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने राज्य  जादूटोणा विरोधी कायदा जनसंवाद प्रबोधन यात्रेची सुरुवात 20 ऑगस्ट 2023 पासून पुणे येथून म. विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून कायद्याची चित्रमय पोस्टर लावून सजवलेल्या गाडीला विविध मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून आली. जादूटोणा विधेयक कायदा विषयक ज्ञान वैचारिक प्रबोधन घोषवाक्य सुसज्ज अशी सजवलेली गाडी पुणे,अहमदनगर ,औरंगाबाद, जालना ,परभणी ,यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा ,नागपूर ,वर्धा अशा पुढील प्रवास असून सदर जनसंवाद यात्रा दौरा करीत चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 5 ते 6 सप्टेबर ला पोहोचत असून विविध कॉलेज महाविद्यालय ,संबंधित तालुका व जिल्हा पोलीस प्रशासन विभाग यात जादूटोणाविरोधी कायदा विषयक जनसंवाद मार्गदर्शन करणार आहे. प्रथमता चंद्रपूर जिल्ह्यात दिनांक 5 सप्टेंबरला पोलीस स्टेशन भद्रावती सकाळी 9.00 वाजता नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहून मा.ठाणेदार, पोलीस अधिकारी व पोलीस प्रशासनाशी संवाद साधणार आहे,सकाळी 11.00 वाजता भद्रावती येथील आयोजित यशवंतराव शिंदे जुनिअर व सीनियर  महाविद्यालयात जनसंवाद कार्यक्रमाला उपस्थित राहून प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे सदर कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यकारी समितीचे प्रमुख पदाधिकारी सदस्य प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे (सातारा) नंदनी जाधव (पुणे) मार्गदर्शन करणार आहेत.अशी माहिती अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे प्रदेश संपर्कप्रमुख ,जनमंच सदस्य नागपूर, महाराष्ट्र अंनिसचे मार्गदर्शक सल्लागार पदाधिकारी रवींद्र तिराणिक, भद्रावती तालुका अध्यक्ष डॉ.राहुल साळवे , कार्याध्यक्ष शारदा खोब्रागडे यांनी एका प्रसिद्धी पत्रान्वये दिली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]