सावरगाव येथे ग्रामसभेमध्ये वादग्रस्त बिअर बार बंद करण्याचा एकमताने ठराव मंजूर.तळोधी  बा.:
        तळोधी  बा. पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावरगाव येथील नव्याने सुरू झालेला 'फ्रेंड्स रेस्टॉरंट अँड बार' हा अत्यंत सावरगाव साठी वादग्रस्त  झालेला असून.  याला तात्काळ बंद करण्यात यावे याकरिता सावरगाव येथील जनतेने  ग्रामसभा घेत या बार ला बंद करण्याकरता मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी महिला व पुरुषांनी उपस्थित राहून 4. सप्टेंबरला झालेल्या  ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करून झाला आहे .

        नागभीड तालुक्यातील  सावरगाव येथील परिसरात हॉटेल अँड  रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी मागून त्या आड परवानाधारक हा बार उघडणार असल्याची चाहूल लागताच प्रशासनाने त्याला बार उघडण्याची परवानगी देऊ नये असे निवेदन खुद्द सरपंचाने स्वतः जिल्हाधिकाऱ्याकडे व अधिक्षक राज्य जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर यांच्याकडे जाऊन दिले असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करून व गावाच्या हिताची कोणतीही पडताळणी न करता अधिक्षक जिल्हा उत्पादन शुल्क चंद्रपूर च्या वतीने व जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने या बारला परवानगी देऊन बार मालक   सौ. कटारे  रा.तळोधी यांना बार उघडण्याचा परवाना देऊन मोकळे झाले.
       महत्वाचे म्हणजे‌ बिअर बारचा परवाना मिळवण्यात आधी त्या जागेवर रेस्टॉरंट किंवा धाबा हा सहा महिने पूर्वी सुरू केलेला व लगातार सहा महिने चालवलेला असणे आवश्यक असल्याचे बोलले जाते. आणि गावातील ग्रामपंचायतचे या बाबतीत परवाना न देन्याचे निवेदन असताना सुद्धा, मात्र त्याबद्दल कोणतीही पडताळणी ही परवाना देनार्या संबंधित विभागाच्या प्रशासकीय अधिकारी यांच्या द्वारे करण्यात आली नाही. हे नवलच. *व बांधकाम अपुरेच असताना व मुळात कोणताही ढाबा किंवा रेस्टॉरंट सुरू नसताना एकाच वेळेस ढाबा व बिअर बार चे उद्घाटन करून मोठ्या थाटामाटात बार सुरू करण्यात आला.* मात्र ही बाब गावकऱ्यांसाठी आश्चर्याची ठरली व यामुळे
 गावातील महिलांनी याच्याविरुद्ध मोर्चा उघडला असून यामध्ये ग्रामपंचायतवर ग्रामसभेने दबाव आणून हा बार लवकरात लवकर बंद करण्यात यावा व त्याकरिता ग्रामसभा घेण्यात यावी असे मागणी रेटून धरली होती.  त्यानंतर सरपंचांनी ग्रामसभा आयोजित करून त्यामध्ये गावातील नव्याने उघडलेला "बार "  बंद करण्याच्या बाबतीत विषय समोर घेऊन ही ग्रामसभा आयोजित केली . यामध्ये मोठ्या संख्येने  या विषयावर जमा  झालेल्या ग्रामसभेत लोकांच्या समक्ष हा बार बंद करण्यात यावा असा ठराव घेण्यात आला.     
                 तत्पूर्वी ग्रामसभेत माननीय सरपंच व ग्राम विकास अधिकारी  यांच्या सहीने  दिलेला  इमारत बांधकाम पूर्णत्वाचा  प्रमाणपत्र यावर बराच वादळ निर्माण झाला . ग्रामसभेत माननीय अधीक्षक जिल्हा उत्पादन शुल्क विभाग व ग्रामपंचायत यांना दिलेला जागेचा नकाशा वेगवेगळ्या असल्याने  बार मालकाने यामुळे संबंधित विभागाची व ग्रामपंचायतीची फसवणूक केल्याचा आरोप सरपंचांनी केला. यामुळेही नागरिकांचा समाधान न झाल्याने शेवटी   ठाणेदार मंगेश भोयर यांनी बार उघडण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगीची गरज नसल्याचे सांगितल्याने सभेतील वादळ शांत झाले.
           मा. जिल्हाधिकारी व मा.अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क या संबंधित अधिकाऱ्यांनी बार उघडण्याचा जो परवाना बार मालकाला दिलेला होता तो रद्द करून ग्रामसभेचा मान राखतात की काय ? याकडे ग्रामसभेचे व लोकांचे लक्ष लागलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]