घरकुल योजनांचे वाजत आहे बारा.तुटपुंजा निधीतून घरकुल अशक्य....

तालुक्यात ग्रामीण भागात एकूण 4015 घरी मंजूर, 2701 घरांचे बांधकाम पूर्ण तर ,1314 घरांची बांधकाम अर्धवट....


वरोरा....जगदीश पेंदाम 

प्रत्येकाला स्वतःची घरे असावे अशी इच्छा असते परंतु वाढत्या महागाईमुळे जनतेच्या स्वप्नांच्या घरांना तळा पडताना दिसत आहे.वरोरा तालुक्यात ग्रामीण भागात मागील सण 2016/17 ते 2021/22/23 वर्षात एकूण 4015 घरी मंजूर झाली असून यामध्ये 2701 घरांचे कामे पूर्ण झाली तर 1314 घरांची कामे चालू आहे. सर्वांना हक्काचा निवार असावा यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारच्या यांच्याकडून विविध घरकुल योजना राबवल्या जात असून पंतप्रधान आवास योजना, शबरी महामंडळ योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, रमाबाई आवास योजना, पारधी समाज घरकुल योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध योजना राबवत असून तालुक्यातील ग्रामीण भागात सन 2016/17, 2021, 22 / 23 मध्ये एकूण घरे 4015 मंजूर असून 2701 घर पूर्ण बांधकाम झाली, 1314 घरांचे बांधकाम प्रगती पथावर आहे....


यामध्ये पंतप्रधान आवास योजनेमार्फत ग्रामीण भागात 2099 घरी मंजूर झाली असून 1717 घरांचे बांधकाम पूर्ण झाले तर 382 प्रगती प्रथावर आहे, रमाई आवास योजना मध्ये 688 घरी मंजूर असून 494 घराचे बांधकाम पूर्ण तर 194 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, शबरी आवास योजना 1135 घरे मंजूर असून 481 घरांचे बांधकाम पूर्ण झाले असून 654 घरांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, विशेष म्हणजे शबरी आवाज योजनेमध्ये सन 2022/ 23 मध्ये 789 घरे मंजूर झालेली आहे तसेच पारधी घरकुल योजना सण 2016,17, 18,19 मध्ये 16 घरे मंजूर असून 2 घरे पूर्ण झालेली असून 14 घरांचे काम प्रगतीपथावर आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत सन 2021/ 22 मध्ये वरोरा तालुक्यातील ग्रामीण भागात 77 घरे मंजूर असून घर बांधकाम पूर्ण झालेली घरे फक्त 7  तर 70 घरांचे काम प्रगतीपथावर आहे, मागील पाच ते सहा वर्षात संबंधित घरकुलाचे कामे पूर्ण होणे आवश्यक होते,मात्र दोन वर्ष कोविड परिस्थितीमुळे घरे बांधकाम थांबले, तसेच अनुदान मिळण्यामध्ये उशीर, रेतीची टंचाई, दिवसेंदिवस होणाऱ्या महागाईमुळे, आदी कारणामुळे घरकुलांची कामे थांबलेली असून 
 बांधकामासाठी अनुदान तटपुंजे असल्याने लाभार्थ्यांना महागाई मध्ये घर बांधताना कर्जबाजारी व्हावे लागत आहे,शासनाकडून देण्यात येणारे अनुदान अपुरी पडत असल्याने लाभार्थ्यांना कर्ज काढावे लागत आहे, नातेवाईक व सावकार, विविध प्रायव्हेट बँका, सोसायटी, मित्रमंडळी यांच्याकडून व्याजाने घर बांधकामासाठी रक्कम घ्यावी लागत आहे शासनाकडून जवळपास 1.लाख 48 हजार रुपयाचे अनुदान मिळत असून काही अनुदान ग्रामीण हमी योजना अंतर्गत मिळत असते, परंतु बऱ्याच लाभार्थ्यांना घर बांधताना वेळेवर अनुदान मिळत नाही ही मात्र शोकांतिका आहे,
घरकुल योजनेला शौचालय बांधणे अनिवार्य असून शौचालय नसल्यास उर्वरित रक्कम लाभार्थ्याला मिळत नाही,घर बांधकाम साहित्याचे भाव गगनाला भिडले असून सिमेंट 350 रू. लोखंड 56 ते 58 हजार क्विंटल, गिट्टी 4000 रू.,शंभर फुट, विटा 16000 हजार रु. रेती 5 ते 6 हजार रू. मुरूम 2000 रुपये ट्रॅक्टर, खिडे, तार, शंभर रुपये किलो, घर बांधकाम मिस्त्री 600 रुपये, हेल्पर 400 रुपये, तर सेंट्रींग 12 ते 14 स्क्वेअर फिट असून घर बांधकामाला जवळपास तीन लाख रुपये लागत असल्याने महागाईच्या काळात लाभार्थ्यांना परवडण्यायोग्य नाही,शासनाने मोफत वाळूचा जी आर काढला असून सहा ब्रास रेती घर बांधकामासाठी देण्याचा निर्णय घेतला परंतु अजून पर्यंत त्याची युद्ध पातळीवर अंमलबजावणी करण्यात आली नसल्याने नं सुटणारे कोडेच आहे.......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]