वाढोणा चे सरपंच अर्धवट ग्रामसभा सोडून जन संवाद पद यात्रेत सामील, ग्रामस्थांचा आरोप.
तळोधी बा : 
         नागभीड तालुक्यातील १३ सदस्य संख्या असलेल्या वाढोणा ग्रामपंचायत ची ग्रामसभा शुक्रवारी ८संप्टेबर रोजी सकाळी ११.३०वाजता आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून वाढोणा चे सरपंच देवेंद्र गेडाम हे होते. तीन विषयावर आधारित ग्रामसभा असताना अध्यक्ष महोदय यांनी विषय सुची नुसार विषय क़्र.३ रमाई आवास, शबरी आवास, यशंवत चव्हाण घरकुल, धनगर घरकुल, मोदी आवास घरकुल योजना अंतर्गत सन २०२२-२०२३ वर्षाकरिता पात्र लाभार्थी निवड विषयावर साधक बाधक चर्चा करून उर्वरित विषय सोडून ग्रामसभा अध्यक्ष सरपंच देवेंद्र गेडाम कुणालाही सुचना न देता वाढोणा गावात आलेल्या काँग्रेस पक्षाचे जन संवाद पद यात्रेत सामील होऊन भाषण केले. त्यामुळे ग्रामसभेत   अध्यक्ष नसल्याने गोंधळ निर्माण झाला. या ग्रामसभेत जवळपास दोनशे वर
नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. मात्र विषय क्र. १ महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत सन २०२२-२३ वर्षाचा सामाजिक अंकेक्षण करणे व विषय क्र. २ प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नोंदणी कुत लाभार्थ्यांचे सामाजिक अंकेक्षण करणे व अध्यक्ष च्या परवानगी वेळेवर येणारे विषय सोडून सभा अध्यक्ष सभास्थळामधून निघून गेल्याने सरपंच च्या कार्यशैली वर ग्रामस्थांनी आक्षेप घेऊन सभा अध्यक्ष ला सचिव एम. एस. घुले यांनी फोन करून बोलविले असता फोन उचलला नाही. त्यामुळे सभा अध्यक्षांनी ग्रामसभा चा अपमान केला. त्यामुळे वाढोणा च्या सरपंच वर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पत्रकार परिषदेत करण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेला वाढोणा चे उपसरपंच भगवान बन्सोड,ग्रामपंचायत सदस्य वासुदेव मस्के, भाजप नगर अध्यक्ष संजय गहाणे,भाजप सचिव धनंजय बोरकर,राष्ट्रवादी शहर अध्यक्ष कृष्णा गंजेवार,  सामाजिक कार्यकर्ते,मंछीन्द्र गोबाडे, मिलिंद गहाणे व ग्रामसभा ला उपस्थित असणारे सदस्य यावेळी उपस्थित होते. 
कोट, 
    वाढोणा ग्रामपंचायत ची ग्रामसभा दिनांक ८संप्टेबर २०२३ ला सकाळी ११.३० वाजता ग्रामपंचायत परिसरात घेण्यात आली. ग्रामसभा विषयानुसार सुरू असताना ग्रामसभा चे अध्यक्ष सरपंच देवेंद्र प्रेमदास गेडाम ग्रामसभा सुरू असताना ग्रामसभा सोडून निघून गेले. त्यामुळे सचिव यांच्या लक्षात आले त्यामुळे पुढील चर्चा ग्रामसभा मध्ये बंद झाली. तेव्हा सचिवांनी अध्यक्ष ची निवड करता येईल परंतु ग्रामसभा मध्ये उपस्थित असलेल्या नागरिकांनी नाकारुन सरपंच अर्धवट ग्रामसभा सोडून गेल्याचे सचिव यांच्या कडून बयान लिहून घेतले. 
एम. एस. घुले
ग्रामविकास अधिकारी 
वाढोणा ग्रामपंचायत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]