@ गडचिरोली पोलीस भरतीतील बोगस उमेदवारांना अभय @ जात वैद्यता प्रमाणपत्र अवैद्य असल्यावरही कारवाईसाठी दिरंगाई@ खऱ्या उमेदवारांवर अन्याय झाल्याने उपोषणाचा इशारा

@ गडचिरोली पोलीस भरतीतील बोगस उमेदवारांना अभय 
@ जात वैद्यता  प्रमाणपत्र अवैद्य असल्यावरही कारवाईसाठी दिरंगाई
@ खऱ्या उमेदवारांवर अन्याय झाल्याने उपोषणाचा इशारा
गडचिरोली -  गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2021 भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीत झाडे कुणबी हे भटक्या जमाती क प्रवर्गात मोडत नसतांना नामसदृश्यतेचा फायदा घेत धनगर समाजातील झाडे या तत्सम जातीचे बोगस प्रमाणपत्राचे आधारे निवड यादीत आल्याने या उमेदवारांवर पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचेकडे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी आक्षेप दाखल केले. या आक्षेपावरून त्यांना रुजू करून घेण्यात आले नाही मात्र त्यांचे जात वैद्यता प्रमाणपत्र अवैद्य ठरविण्यात आले असतांनाही निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात आलेली नसल्याने पिढीत उमेदवारांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.
          गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2021 ची भरती प्रक्रिया झाली असून निवड यादीत भटक्या जमाती क प्रवर्गातील आरक्षित जागांवर बोगस झाडे कुणबी यांचे नावे आहेत त्यामुळे खऱ्या उमेदवारांनी आक्षेप दाखल केले होते. मागील 2019 च्या पोलीस भरतीत तीन बोगस झाडे कुणबी उमेदवारांची निवड करण्यात आली त्यावरही प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी व धनगर संघटनांनी आक्षेप घेऊनही रुजू करून घेण्यात आले व अजुनपर्यँत बोगस उमेदवारांचे जात वैधता प्रकरण निकाली काढलेले नाही.
      निवड यादीतील पालेश्वरी साईनाथ मुलकलवार व सचिन देवराव मादावार या उमेदवारांचे शैक्षणिक काळात जात वैधता प्रमाणपत्र नाकारले होते. त्यानंतरही प्रशासनाच्या डोळ्यात धुळफेक करीत बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे भरतीत सहभागी झाले व निवड यादीत पात्र ठरले. ही बाबत प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचेकडे आक्षेप नोंदविला. जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुद्न धारगावे यांनी पालेश्वरी साईनाथ मुलकलवार व सचिन देवराव मादावार हे झाडें जातीचे नसल्याने जात वैधता प्रमाणपत्र नाकारले असल्याचे पत्र 24 मे 2023 रोजी पोलीस अधीक्षक यांना दिले. त्यानंतरही पोलीस अधीक्षक यांनी सदर बोगस उमेदवारांवर फसवणुकीचा फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांची निवड रद्द केलेली नाही. त्यामुळे पोलीस विभागच या बोगसगिरीत गुंतल्याची चर्चा आहे.
     इतरही एन टी क प्रवर्गातील बोगस झाडें कुणबी जातीच्या उमेदवारांवर आक्षेप घेतलेला असून त्या सर्वांच्या बोगस जातीबाबत पुरावे सादर केले आहे. सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे असताना या प्रकरणात पोलीस विभाग व जात पडताळणी विभाग दिरंगाई करीत असल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]