उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आयुष्यमान भव आरोग्य मेळावा संपन्न

४५१ रुग्णांनी घेतला याचा लाभ

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - आज दिनांक. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे आयुष्यमान भव मोहिमे अंतर्गत आरोग्य मेळाव्याचे आयोजन केंद्र शासन व राज्य शासनाच्या आदेशानुसार आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ( कान,नाक, घसा ) जनरल फिजीशीयन, शल्यचिकित्सा, त्वचारोग, दंतचिकित्सा, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, अस्थिरोग, मनोविकार तज्ञ यांच्या मार्गदर्शनात रुग्णांना आरोग्याबाबतचा मोफत सल्ला व सेवा देण्यात आली‌, यावेळी चिमूर तालुक्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील ४५१ रुग्णांनी या योजनेचा लाभ घेतला.या आरोग्य मेळाव्याकरिता बाहेरून आलेले आमंत्रित तज्ञ डॉ.आशिष पोडे , डॉ.मुळेवार , डॉ.निलेश लोखंडे , डॉ.संजय गायधनी , डॉ.प्रफुलकुमार चौधरी , डॉ.मंगेश उमरे ,डॉ.अश्विन अगडे , डॉ.वंदेश शेंडे ,डॉ. नागोसे , डॉ.प्रवीण बुटोलिया हे डॉक्टर तसेच अधिपरीचारिका कु.दिपाली धोटे ,कु.विशाखा पिल्लेवान , गीतेश मंडळ , कु.प्रतीक्षा आक्रोडे , श्रीमती शिल्पा मोतकूलवार , कु.मेश्राम , वैशाली नैताम ,कु.रविना भगत , श्रीमती.रूपाली दांगट यांच्या प्रमुख उपस्थितित जिल्हा शल्यचिकित्सक डॉ‌.चिचोले, बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.कन्नाके, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आनंद किंन्नाके व इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी तसेच एन.सी.सी.पथक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]