पवनी वनपरिक्षेत्र कार्यालयावर प्रहरचा गदर आंदोलन संपन्न

शेकडो शेतकरी आले एकत्र 

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : -दिनांक. २७/०९/२०२३ ला प्रहार जनशक्ती पक्ष पवनी तर्फे शेतकऱ्यांच्या प्रमुख सहा मागण्यावर आंदोलनाचे आयोजन केले. (१ ) वन्य जीवापासून होणाऱ्या शेतीची नुकसान टाळण्यासाठी आपण शासन स्थळावर कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा. (२) वन्य जीवापासून शेत पिकाचे नुकसान भरपाई साठी हेक्टरी ५० हजार रुपये व ( एकरी २० हजार रुपये ) नुकसान भरपाई देण्यात यावे.  (३) वन्य जीवापासून वाघ बिबट अस्वल व इतर प्राण्यापासून जीव गेल्यास कुटुंबातील सदस्याला महिला पुरुष यांना कंत्राटी पद्धतीने कायमस्वरूपी काम देण्यात यावे. (४) वनालगत असलेल्या वनविभाग व ग्रामपंचायत  संलग्नित समित्या उदाहरणात जे.एफ.एम. व ई.डी.सी. यांच्या मधील संपूर्ण निधी ग्राम विकासासाठी पर्यावरण विकासासाठी वृक्षारोपण विकासासाठी फळबाग व फुलबाग विकसित करण्यासाठी फक्त ग्राम पंचायत मध्ये खर्च करण्याबाबत जेनेकरून ग्राम पंचायत व वन विभागाला समन्वय साधता येईल. (५) वन्य जीवापासून होणाऱ्या शेतीची नुकसान भरपाई रक्कम हि शेतकऱ्यास ३ महिन्याच्या आत मिळावी. (६) उमरेड - पवनी कऱ्हाडला अभयारण्यातील गावे आणि उर्वरित शेती तात्काळ पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून हस्तांतर करून त्यात पुनर्वसन धारकांना जास्तीत जास्त मोबदला देण्यात यावा. याकरिता पवनी येथील वन विभाग कार्यालयावर वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्यामुळे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असलेल्या पीकांची मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांपासून नुकसान होत आहे. शेतामधील धान कडधान्य तसेच अनेक प्रकारचे पीक पवनी तालुक्यामध्ये शेतकरी घेत असतात परंतु संपूर्ण सभोवताल अभयारण्य असल्यामुळे त्यामध्ये सर्वात जास्त जंगली प्राणी यांचे वास्तव्य असतात. शेतकऱ्यांना जंगल भागातील शेती करणे एक मोठे संकट ठरत आहे. शेती करणे हे त्यांच्यासमोर तारेची कसरतच म्हणावी लागेल शेतामध्ये पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असल्यामुळे शेतकरी व शेतमजूर पीक घेण्यासाठी असमर्थ झालेले आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या हक्काच्या न्यायाकरिता व मागण्या मंजूर होण्याकरिता या संपूर्ण नेतृत्वाची धुरा सांभाळणारे आमदार बच्चु कडू प्रहार जनशक्ती पक्ष तसेच किशोर पंचभाई यांचे नेतृत्वाखाली प्रहरच्या गदर आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.प्रहार जनशक्ती पक्ष पवनी द्वारा वनविभागावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये शिवाजी चौक पवनी येथे सभेला मार्गदर्शन करत असताना आमदार बच्चू कडू यांनी वन विभागाचे अधिकारी, तहसीलदार पवनी, पोलीस निरीक्षक पवनी व तालुक्यातून आलेले जंगल व्याप्त भागातील मोठ्या प्रमाणात आलेले शेतकरी यांना मार्गदर्शन करताना वन्य प्राण्यांपासून आमच्या शेतकरी बांधवांना होणारा त्रास व त्या त्रासातून मुक्तता कशी करता येईल यासाठी मी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा करून समस्त शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नरत राहील.
बच्चूभाऊ कडू यांचे पवनी नगरात मेजर शहीद प्रफुल मोहरकर यांच्या स्मारकापासून मोर्चाला सुरुवात झाली. आमदार बच्चुभाऊ कडू बैलबंडीवर विराजमान होऊन गांधी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व नंतर शिवाजी चौक सभास्थळी दाखल झाले. सर्व महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्प माला अर्पण करून मोर्चामध्ये आलेल्या शेतकरी बांधवांच्या अडीअडचणी समजून घेऊन मार्गदर्शन केले. आजचा शेतकरी मोर्चा यशस्वी झाला. अशा प्रकारचा समाधान घेऊन शेतकरी वर्ग परतीला लागला. सदर मोर्चा यशस्वी करण्याकरिता किशोर पंचभाई, अक्षय तलमले, व प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. पोलीस विभाग, वनविभ आग, तहसील कार्यालयाची चमू यांच्याशी मंचकावर बैठक घेऊन अन्यायग्रस्त शेतकरी बांधवांच्या अडचणी लवकरात लवकर सोडवण्यात याव्या असे संभावित विभागाला  निर्देश दिले.यावेळी प्रहार जनशक्तीचे पदाधिकारी तसेच दूध राम बावनकर प्रहार जनशक्ती उपजिल्हा प्रमुख भंडारा , सोनू दंडारे , रोहित नागपुरे ,हर्षल वाघमारे , मुकुल सावरबंधे , होमदेव वाघमारे , रुपेश जुमळे ,अक्षय तलमले , योगेश निखारे , मुकेश जांभुळकर , प्रवीण वंजारी , धनराज शेलोकर , अमोल बानाईत ,दत्तू हटवार व इतर पदाधिकारी या आंदोलनात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]