राज्यस्तरीय श्री चक्रपाणी प्रभू ग्रामस्वच्छता अभियानाचा शुभारंभ
आचरणशिल समाजनिर्मितीच्या कृतीशील उपक्रमात आपणही सहभागी व्हा..

"सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर" द्वारा आयोजित 'राज्यस्तरीय श्री चक्रपाणी प्रभू स्वच्छता अभियान तथा जन्मोत्सव सोहळा' २०२३ (वर्षं ११ वे  या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा, तथा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अष्टशताब्दी अवतरण दिन महोत्सव शनिवार दि. १६ /९/२०२३ ला महानुभाव पंथीय श्री दत्तात्रेय प्रभू मंदिर तळोधी (बा)ता.नागभिड जि.चंद्रपूर येथे संपन्न झाला.
वैदिक  व सनातनी मुल्यांना नाकारून विषमता, कर्मकांड, जातीभेद आणी वर्णभेद याविरुद्ध बंड पूकारून स्वातंत्र्य, समता, बंधुता ई.मानवी मुल्यांचा पुरस्कार करत स्त्रीयांना सन्मान व प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या तसेच मराठी भाषेला आपली धर्मभाषा म्हणून पुरस्कार करून तीचा आग्रह धरणार्‍या, *महानुभाव धर्म प्रवर्तक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या ८०२ व्या अष्टशताब्दी अवतरण दिन महोत्सवाचे औचित्य साधून महानुभाव पंच कमेटी व आद्यकवयित्री महदाईसा महिला मंडळ यांच्या सहकार्याने संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता अभियान राबवून स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी मंदिर चक चारगाव येथील परिसरात वृक्षारोपण करून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या वृक्षप्रेम व वनसंवर्धनाच्या विचारांचे स्मरण करण्यात आले.* यानिमित्ताने श्री दत्त मंदिर तळोधी (बा) येथे भजन, किर्तन, गोपाळकाला इ. आध्यात्मिक उपक्रम राबविण्यात आले.
      ग्रामस्वच्छतेचे आद्य प्रणेते, महानूभाव धर्माचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू महाराज ( कार्यकाल १०४२ ते ११४३)यांनी सुमारे ९०० वर्षांपूर्वी हातात सूप व खराटा घेऊन वयाचे ६३ वर्षे अविरतपणे ग्रामस्वच्छता करून स्वच्छतेचा कृतीशील संदेश या भारतभुमीमध्ये सर्वप्रथम दिलेला होता. यांच्या महान अशा ग्रामस्वच्छता विषयक कार्याची माहिती प्रत्यक्ष आचरणाद्वारे जणमाणसांत रूजवण्यासाठी तसेच त्यांच्या समाजोद्धारक विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर द्वारा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतरण दिन ते श्री चक्रपाणी प्रभू जन्मोत्सव या  कालखंडामध्ये मागील १० वर्षांपासून  राज्यभरातील अनेक गावांमध्ये ग्रामस्वच्छता अभियान राबवून जनजागृती करण्यात येत आहे. 
     राज्यभरातील विविध सामाजिक व आध्यात्मिक संस्था, संघटना व मंडळे यांनी या आचरणशिल समाजनिर्मितीच्या कृतीशील उपक्रमात सहभागी होऊन आपल्या गाव, मंदिर, आश्रम परिसरात स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवून  सहकार्य करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. या  राज्यस्तरीय स्वच्छता अभियानाचा समारोपीय सोहळा मौजा विरखंडी ता.कूही  जि.नागपूर येथे दि.०५ व ०६ नोव्हेंबर २०२३  ला राज्यभरातील नामवंत विचारवंत व  मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]