*नुव युवक तान्हा पोळा उत्सवाला मराठी अभिनेत्री प्रतीक्षा शिवनकर यांची हजेरी
नवयुवक तान्हा पोळा उत्सव समिती,चंद्रपूर रोड मुल द्वारा भव्य तान्हा पोळा दि.१५ सप्टेंबर २०२३ ला आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मराठी सोनी वाहिनीवरील "जीवाची होतीया काहीली" या मालिकेतील मुख्य अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर यांची विशेष उपस्थिती होती.
भव्य तान्हा पोळा कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून परम पूज्य श्री.मुरलीधर महाराज हरणघाट,श्रीमती संध्याताई गुरूनुले माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर, प्रा. रत्नमालाताई भोयर माजी नगराध्यक्ष नगर परिषद मुल,श्री.नंदुभाऊ रणदिवे माजी उपाध्यक्ष नगर परिषद मुल,श्री.प्रभाकर भोयर सामाजिक कार्यकर्ते,श्री.महेंद्र करकाडे माजी नगरसेवक न. प.मुल,श्री.प्रशांत लाडवे माजी नगरसेवक न. प.मुल यांची उपस्थिती होती
याप्रसंगी उत्कृष्ट मोठा नंदी,उत्कृष्ट लहान नंदी,उत्कृष्ट वेशभूषा असे अनेक पुरस्कार देऊन बालगोपालांचे कौतुक करण्यात आले.तसेच सहभागी सर्व चिमुकल्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज कुडे यांनी तर पंकज लाडवे यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवयुवक तान्हा पोळा उत्सव समितीचे पदाधिकारी आकाश गुरुनुले,स्वप्नील आक्केवार,शुभम चरडूके,चैतन्य भोयर, स्वरूप मरस्कोल्हे,प्रतीक लाडवे,आश्रय लेनगुरे,महेश मांदाळे, शंतनु चरडूके,मृणाल कावळे, विप्लव चौधरी,राम करकाडे यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]