शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या! किशोर टोंगे यांची मुख्यमंत्र्यांसह उप मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे मागणी
वरोरा..जगदीश पेंदाम
        
 वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्राचे युवा नेते किशोर टोंगे यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने पीकविमा आणि हेक्टरी एक लक्ष रुपये मदत मिळावी अशी मागणी आज मंत्रालयात निवेदनाद्वारे केली.
वरोरा आणि भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन या पिकावर आलेल्या रोगामुळे पीक हे पूर्णता पिवळे पडून वाळायला लागले आहे. 
यावर्षी सोयाबीनचे चांगले उत्पन्न मिळेल आणि चार पैसे हाताशी येतील अशी आशा आमच्या शेतकरी बांधवाना होती मात्र जिल्ह्यात झालेल्या अति पावसामुळे अनेक प्रकारचे रोग सोयाबीन पिकावर येऊ लागले आणि सोयाबीन हे पीक होतेचे नव्हते करून गेले त्यामुळे शेतकरी हा चिंतेत असून तो सरकारी मदत मिळेल या आशेवर आहे.याची दखल घेऊन आपण तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. संबंधित पिकाचा विमा तात्काळ देण्याबाबत विमा कंपन्यांना निर्देश द्यावेत. सरकारकडून हेक्टरी एक लाख रुपये अनुदान मिळावे तसेच कमी दर्जाचे उत्पन्न झाल्यास हमीभावाने खरेदी करावे अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]