पोलीस पाटील भरती प्रक्रियेत उमेदवारांकडून आर्थिक देवाण घेवाण करून उमेदवार निवडल्याचे प्रशांत कोल्हे उप जिल्हा प्रमुख शिवसेना, चंद्रपूर (उ. बा. ठा) गट यांचा आरोप

भरतीच्या नावाखाली जनतेकडून केली लाखोंची वसुली सत्ताधारी पक्षाच्या महामंत्र्याची पोल खोल 

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - दिनांक ०६/०९/२०२३ रोजी ठीक १२.३० वाजता चिमूर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली हि पत्रकार परिषद घेण्याचे कारण म्हणजे चिमूर तालुक्यात काही महिन्या आधी पोलीस पाटील भरती प्रक्रिया पार पडली, त्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अनेक उमेदवारांकडून आर्थिक देवाण घेवाण करून उमेदवार निवडल्याचे आरोप करण्यात आले होते. त्याबाबत शिवसेने कडून सुद्धा पोलीस पाटील भरती प्रक्रियेची चौकशी करण्याबाबत चे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. तसेच माहिती अधिकाराच्या अंतर्गत याबाबत ची संपूर्ण माहिती मागविली आहे. सदर माहिती प्राप्त होईस्तव शिवसेने कडून करण्यात येणारे आंदोलन सध्याच्या परिस्थितीत स्थगित केले होते.अशातच भाजपा युवा मोर्चा चिमूर तालुका , महामंत्री रोषण मधुकर बन्सोड यांनी इंडिया आघाडीतील आम्हचा मित्र पक्ष काँग्रेस यांचे कडून रक्षाबंधनाच्या निमित्य चिमूर तालुक्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या विषयावर खंडसंगी लाईव्ह या गृपवर पोष्ट केली. त्या पोष्टवर शिवसेनेचे प्रशांत कोल्हे व भाजप चे रोषण बन्सोड यांच्यात वैचारिक मांडणी, पोष्ट सुरु होत्या, अशातच पोलीस पाटील भरती प्रक्रियाचा विषय निघाला आणि त्यांनी स्वतःच आपल्या पोष्ट च्या माध्यमातून पोलीस पाटील भरती प्रक्रियेत पैसे घेतले आणि काम नाही झाले म्हणून पैसे परत पण केले. अशी कबुली त्यांनी गृपवर दिली. त्यातच रोषण बन्सोड हे भाजपाचे पदाधिकारी असून, त्यांच्या फोरव्हीलर गाडीवर भाजपचे कमळाचे चिन्ह काढून अनेकांना गंडा घातल्याची माहिती आहे. रोषण बन्सोड यांचे किराणा दुकान असून अवैध पणे कोरोना काळात मजा या नावाने असलेला सुगंधित तंबाखू मोठ्या प्रमाणात अव्वाच्या सव्वा किमतीत त्याने विक्री केली. आत्ताच्याही क्षणी हा अवैध व्यवसाय पक्षाच्या नावाने तो करीतच आहे.त्यामुळे पोलीस पाटील भरती प्रक्रियेत घोटाळा झाल्याची व पक्षाचेच कार्यकर्ते यांची निवड करण्यात आली हे केलेले आरोप गृपच्या माध्यमातून त्यांच्या स्वकबुलीवरून सत्य वाटते. त्याकरिता शासन प्रशासनाने पक्षाचे नाव घेऊन गोर गरीब जनतेला लुटण्याचे काम करीत असलेल्या या रोषण बन्सोड यांची कसून चौकशी करण्यात यावी. तसेच भाजपच्या पदाधिकार्यांनी सुद्धा रोषण बन्सोड विषयी जनतेसमोर खुलासा सादर करावा. त्यातच रोषण बन्सोड यांनी प्रशांत कोल्हे यांच्यावर सुद्धा SMS / SRK या कंपनी कडून देणेघेणे झाल्याचा आरोप केला, सदर आरोप हा बिनबुडाचा असून कसल्याही प्रकारची आर्थिक देवाण घेवाण झाली नाही. व सुरवाती पासून ते शेवट पर्यंत मी स्वतःहून या रस्त्यावर लोकांच्या न्याय हक्कासाठी लढत होतो, लढत आहे, आणि लढत राहणार अशी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी पत्रकार परिषदेला प्रशांत कोल्हे, शिवसेना उप जिल्हा प्रमूख, श्रीहरी सातपूते तालुका प्रमुख, नितीन लोणारे शहर प्रमुख, संजय वाकडे - उप तालुका प्रमुख, सुनिल हिंगणकर प्रसिद्धी प्रमुख, पुंडलीक सायशे, सुरेश डांगे व आदी शिवसैनिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]