मोठ्या उत्साहात पार पडला वाढोणा येथे तान्हापोळावार्ताहर - ग्रामीण भागाची संस्कृती जपली पाहिजे व लहान मुलांना ती समजली पाहिजे या हेतुने  ग्राम पंचायत वाढोणा तर्फे जुना बाजार चौक वाढोणा येथे तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले होते या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. देवेंद्र गेडाम सरपंच ग्राम पंचायत वाढोणा तर प्रमुख पाहुणे मा. मंगेश भोयर ठाणेदार पोलिस स्टेशन तळोधी बा. हे उपस्थित होते.
              या तान्हापोळ्याच्या स्पर्धेत गावातील साधारणतः 287 बालगोपाल आपले नंदीबैल व वेशभुषेसह उपस्थित होते त्या पैकी प्रथम क्रमांक हर्षीद देवेवार 501 रोख ट्राफी बुक व पेन देवुन त्याचा गौरव करण्यात आला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक प्रज्वल ठाकुर याला 301 रोख ट्राफी बुक व पेन तर तृतिय क्रमाकांचे बक्षिस मोहित येसनसुरे  याला 201 रोख ट्राफी बुक व पेन देवुन गौरविण्यात आले. तर ठाणेदार साहेब यांचे वतीने 10 आकर्षण बक्षिस म्हणून देण्यात आले तर उपस्थित सर्व बालगोपालांना ग्राम पंचायत वाढोणा तर्फे बुक व पेन देण्यात आले.
         यावेळी मा. देवेंद्र गेडाम सरपंच ग्राम पंचायत वाढोणा, मा.  मंगेश भोयर ठाणेदार पोलिस स्टेशन तळोधी बा., प्रदिप येसनसुरे,अनिल डोर्लिकर, वासुदेव मस्के, मंगला बोरकर, मिनाश्री कोमावार, शशीकला ठाकरे,उषा पाटील, सरीता शेन्डे, रेषमा सडमाके, प्रियंका गंजेवार, आदी ग्राम पंचायत सदस्य, ग्राम पंचायत कर्मचारी, पोलीस पाटील, नावातील महीला बालगोपाल व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]