महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयात राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारणी गठीतमहात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालय तळोधी (बाळापुर)येथे दिनांक ०२ सप्टेंबर २०२३ ला राज्यशास्त्र विषयांतर्गत अंतर्गत राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची कार्यकारणी गठित करण्यात आली.राज्यशास्त्र विषयांतर्गत या ज्ञान शाखेत येणाऱ्या राजकीय सिद्धांत, राजकीय विचार प्रणाली, तुलनात्मक राजकारण,
लोकप्रशासन,आंतरराष्ट्रीय संबंध यांचा अभ्यास करणे. राज्यशास्त्र विषय स्पर्धा परीक्षेतील एक लोकप्रिय विषय म्हणून ओळखला जातो. विविध प्रशासकीय पदासाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षेत राज्यशास्त्र विषयावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करून स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणे या उद्देशाने राज्यशास्त्र विषय मंडळाची स्थापना करण्यात आली. राज्यशास्त्र अभ्यास मंडळाची विद्यार्थी कार्यकारणी  प्राचार्य श्री.जी.जे बुलबुले सर यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली.राज्यशास्त्र अभ्यास मंडळा अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांमधून अध्यक्ष,उपाध्यक्ष, सचिव,संघटक, कोषाध्यक्ष व इतर सदस्य म्हणून निवड 
करण्यात आली. राज्यशास्त्र मंडळाच्या स्थापनेबद्दल व गठीत झालेल्या कार्यकारणी बद्दल कल्याण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री उमेषजी गेडाम साहेब, सरचिटणीस सौ.मालतीताई गेडाम मॅडम, महात्मा फुले उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री जी.जे बुलबुले सर, उपप्राचार्य मा.श्री ए.एन.कोराने सर.पर्यवेक्षक मा.श्री पी.एम. कोहपरे सर यांनी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राज्यशास्त्र विषयाचे प्रा.डॉ दैवत बोरकर सर, प्रा गणेश उगेमुगे सर,प्रा गुलाब मांढरे सर,प्रा शुद्धोधन डांगे सर यांनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाला बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]