शेतकऱ्यांना सरसकट एकरी पन्नास हजार रुपये नुस्कान भरपाई देण्यात यावी... अभिजीत पावडेवरोरा... जगदीश पेंदाम
 यावर्षी नैसर्गिक आपत्ती खूप मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यात आले आहे यात वरोरा तालुक्यात सुरुवातीच्या मृगनक्षत्रात पाऊस पडलाच नाही त्यानंतर पंधरा दिवसांनी पावसाला सुरुवात झाली पेरणीसाठी पुरेसा पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उशिरा पेरणी केली त्यानंतर काही दिवस पाऊस आला नाही त्यामुळे  काही शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.. 
तालुक्यातील शेगाव चारगाव अर्जुनी धानोली दादापुर मानोरा कोकेवाडा किनारा वायगाव निमडला बेंबळा या गावातील सर्व नदी नाले अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे ओव्हरफ्लो वाहून तसेच परिसरात असलेल्या चारगाव मध्यम प्रकल्प धरणाला महापूर आल्याने पुराच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान केले होते. शेतामध्ये असलेल्या उर्वरित पिकामध्ये शेतकऱ्यांनी महागडे औषधी वापरत पुन्हा एकदा फवारणी करत सोयाबीन पिके परंतु पुन्हा आलेल्या पावसाने येलो मोझाक व करपा रोगांनी सगळीकडे सोयाबीन पिके नष्ट केली असून परिसरातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान केले आहे त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच शेतकऱ्यांनी घेतलेले शेतीसाठी पीक कर्ज माफ करून धीर द्यावा अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अभिजीत पावडे यांनी केलेली आहे..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]