सोयाबीन पिकांची पाहणी करण्यासाठी जिल्हा कृषी अधीक्षक पोहचले खानगांव येथिल शेतकऱ्यांच्या शेतात

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - तालुक्यातील सोयाबीन पिकावर विविध प्रकारची कीड व रोग अचानकपणे आल्यामुळे दोनच दिवसात संपूर्ण सोयाबीन पीक पिवळे पडून मोठया प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे पीक हंगामात हवामानातील प्रतिकुल परिस्थिती मुळे पिकाचे होणारे नुकसान या जोखमीच्या बाबी अंतर्गत सर्व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा लागु करावा, व तात्काळ सोयाबीन पिकाचे नुकसान भरपाई द्या अशी मागणी जिल्हा स्तरीय समिती कडे शेतकरी यांनी केली आहे.चंद्रपूर जिल्हा स्तरीय समिती यांनी खानगाव येथिल शेतकरी किरण ढोक, सतीश घानोडे,सावरी येथिल शेतकरी विलास उमरे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. चंद्रपूर जिल्हा स्तरीय समिती मधील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शंकरराव तोटावार, कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही चे डॉ.विनोद नागदेवते,कृषी तालुका अधिकारी तिकडे साहेब,कृषी अधीक्षक शेन्डे साहेब,कृषी मंडळ अधिकारी रामटेके साहेब, कृषी पर्यवेक्षक सोनवाने व चव्हाण मॅडम कृषी सहायक मोरे व मापारी चिमूर तालुक्यातील विविध महसूल मंडलमधील खानगांव - सावरी येथिल  गावातील सोयाबीन नुकसान क्षेत्राला भेट देऊन पाहणी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]