अल्पवयीन मुलीवर अत्याचार

 तळोधी (बा.)  - नागभिड पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जनकापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर एका बावण वर्षीय इसमाने अत्याचार केल्याची घटना आज११ वाजताचे दरम्यान घडली.या घटनेने परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.नागभीड पोलिसांनी आरोपीस अटक करून गुन्हा दाखल केला आहे.
            पहिल्या वर्गात शिकणारी सहा वर्षीय मुलगी आज रविवार  असल्यामुळे घरीच होती.तर आई वडील कामानिमित्ताने शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत सुधाकर महादेव निमगडे (वय ५२) जनकापूर याने मुलीस चॉकलेटचे आमिष दाखवून मोटारसायकलवर बसवून गावच्या चौकातील दुकानात घेऊन गेला.आरोपी आणि पिडित मुलीच्या कुटुबांचे चांगले संबंध असल्यामुळे मुलीनेही आरोपीवर विश्वास टाकला व त्याचेबरोबर दुकानात गेली.दुकानातून चॉकलेट घेतल्यानंतर आरोपीने मुलीस तिच्या घरी सोडले.मात्र घरी कोणी नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचेतील राक्षस जागा झाला.आणि या नराधमाने चिमुकलीवर अत्याचार केला.
             त्याचे हे दुष्कृत्य सुरू असतांना पिडित मुलीचा १२ वर्षीय भाऊ घरी आला.त्याच्या नजरेस हे दृश्य पडताच त्याने पोलिस पाटलाचे घर गाठून घटनेची माहिती पोलिस पाटलास दिली. पोलिस पाटलांनी लगेच नागभीड पोलिस ठाण्यास ही माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व आरोपीस अटक करण्यात केली.आरोपीविरोधात भादंविच्या कलम ३७६ एबी, २ एफ, ४५०,५०६, ४,८,१९ पास्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नागभिड पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]