बिइओ लटकला लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

सावली तालुक्यात उडाली खळबळ


चंद्रपूर, 27 सप्टेंबर 2023: चंद्रपूर जिल्ह्यातील सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात लाचलुचपत विभागाने धाड टाकली. यात गट शिक्षण अधिकारी लोकेश खंडारे यांना लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले. खंडारे यांनी एका शिक्षकाला लाच मागितल्याचा आरोप आहे. निलंबीत शिक्षक मिलिंद चांदेकर यांचे निलबन काळातील रजा मंजूर प्रकरणात 10 हजार लाच घेतांना कारवाई केली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, लोकेश खंडारे यांनी जि. प. शाळा राजोली फाल येथील माजी शिक्षक मिलिंद चांदेकर यांचेकडून लाच घेतली. या शिक्षकाने याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या आधारे विभागाने खंडारे यांच्या कार्यालयात छापेमारी केली. यावेळी खंडारे शिक्षकांकडून लाच घेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही रक्कम किती होती, याबाबत अधिक माहिती प्राप्त झालेली नाही. खंडारे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सावली पंचायत समितीच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]