तालुक्यातील अनेक शेती पिकासहित भाजीपाल्यांचे नुकसान... पुलावरून पाणी असल्याने ग्रामीण भागातील वाहतूक ठप्प...वरोरा....जगदीश पेंदाम

तालुक्यात दोन ते तीन दिवसापासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कपास तूर भाजीपाला पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ग्रामीण भागातील मार्ग वाहतूक ठप्प झाली..

तालुक्यातील शेगाव, चारगाव, अर्जुनी, धानोली, दादापूर, मानोरा, कोकेवाडा, किनाळा, आष्टा, कारेगाव,पारोधी चंदनखेडा परिसरातील  सर्व नदीनाले अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे ओवर फ्लो वाहून तसेच परिसरातील असलेल्या चारगाव मध्यम प्रकल्प धरणाला महापूर आल्याने पुराच्या पाण्याने महारुद्र रूप प्राप्त करून सर्वत्र पाण्याचे अच्छादन पसरत शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून ग्रामीण भागातील कमी उंचीचे पुलावरून पाणी असल्यामुळे वाहतूक ठप्प पडलेली आहे, या महाभयानक पुराणे परिसरातील शेतकऱ्यांचे डोळ्यासमोर असलेले पिके वाहून गेले असताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकट कोसळलेले आहे त्यामुळेच शासनाने शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]