कवितेच्या घराचे बापुरावजी पेटकर काव्य पुरस्कार जाहीर...अशोक इंगळे, अे.के. शेख, एकनाथ आव्हाड, रजनी राठी, शृंखल खेमराज पुरस्कारांचे मानकरी.....

वरोरा ...जगदीश पेंदाम 

साहित्यक्षेत्रात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय असलेल्या शेगांव बुद्रुक येथील कवितेच्या घरातर्फे देण्यात येणारे सन २०२३ चे बापुरावजी पेटकर काव्य पुरस्कार नागपूर येथील नेताजी सांस्कृतिक भवनात आयोजित पुरस्कार घोषणा कार्यक्रमात पाहुण्यांच्या हस्ते जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते होते, तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, लेखक शत्रुघ्न लोणारे, लॉयन्स क्लबच्या पदाधिकारी प्राचार्या रंजना दाते, संकल्पनाकार किशोर पेटकर, कवितेच्या घराचे कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे प्रामुख्याने उपस्थित होते. 
काव्यप्रांतात अभिनव संकल्पना म्हणून गाजत असलेल्या कवितेच्या घराच्या पुरस्कारासाठी महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील ( गोवा, बेळगाव ) कवींकडून व  प्रकाशकांकडून १०८ कवितासंग्रह प्राप्त झाले होते. 
पुरस्कार निवड समितीचे परीक्षक   म्हणून नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी भाषा विभागप्रमुख व सुप्रसिद्ध कवी डॉ. पी. विठ्ठल तसेच आर्वी येथील  प्रसिद्ध गझलकार विद्यानंद हाडके यांनी पाच कवितासंग्रहांची पुरस्कारांसाठी निवड केली. डॉ. माधुरी मानवटकर पुरस्कृत बापुराव पेटकर उत्कृष्ठ कवितासंग्रह पुरस्कार डॉ. अशोक इंगळे ( अकोला ) यांच्या 'आयडेंन्टिटिचे बॅन्डेट युद्ध' या कवितासंग्रहाला, श्रीकांत पेटकर पुरस्कृत बापुरावजी पेटकर उत्कृष्ठ गझलसंग्रह पुरस्कार अे के शेख ( पनवेल, मुंबई ) यांच्या 'दिवान ए अेके' या गझल संग्रहाला किशोर पेटकर पुरस्कृत बापुरावजी पेटकर उत्कृष्ठ बालकवितासंग्रह पुरस्कार एकनाथ आव्हाड ( मुंबई ) यांच्या 'पाऊस पाणी हिरवी गाणी' या बालकवितासंग्रहाला, कौशल्याबाई पेटकर पुरस्कृत उत्कृष्ठ हिंदी कवितासंग्रह पुरस्कार रजनी राठी ( अमरावती ) यांच्या 'धरोहर' या कवितासंग्रहाला तसेच कौशल्याबाई पेटकर उत्कृष्ठ इंग्रजी कवितासंग्रह पुरस्कार शृंखल खेमराज ( नागपूर )यांच्या  'The steadily change' या संग्रहाला जाहीर करण्यात आला.  बापुरावजी पेटकर यांच्या स्मृतिदिना निमित्त दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी कवितेच्या घरात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवर साहित्यिकांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल असे कवितेच्या घराचे संस्थापक श्रीकांत पेटकर, संकल्पनाकार किशोर पेटकर, कार्यवाह प्रा. प्रमोद नारायणे, कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप भेले व प्रसिद्धी प्रमुख सूर्यकांत पाटील यांच्या वतीने कळविण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवरांनी पुरस्कार प्राप्त कवींचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे संचालन नितीन वैद्य यांनी तर आभार शार्दुल पेटकर यांनी मानले. पुरस्कार घोषणा कार्यक्रमाला संजय गोडघाटे, ह्रदय चक्रधर, मधुकर पेटकर, प्रा. प्रवीण वरघणे, डॉ. मृणाली पेटकर, प्रा. योगिता मेश्राम, प्रा. अंजली वरघणे, भारती लभाने, अरविंद वैद्य, संजय पुनवटकर, उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]