दोन तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डेमय झालेल्या रस्त्यांची दुरूस्ती करा : मनसे तालुका अध्यक्ष भोजराज कांबळी

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी ते लाखांदुर दोन तालुक्याला जोडणारा रस्ता लोक प्रतिनिधी व शासनाच्या दुर्लक्षित पणामुळे अस्त - वस्त झाला आहे. खड्डेमय झालेल्या रस्त्यावरील खड्डे त्वरित दुरुस्त करून ये - जा करण्यास रस्ता सुरळी करा पवनी तालुक्यातील रस्त्यावर येणारे गाव शिंदपुरी भेंडाळा खैरी दिवाण आसगाव बोरगाव या मार्गावरील बहुतांश ठिकाणी लहान मोठ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असुन पावसाच्या पाण्यामुळे खड्डे भरलेले असतात त्यामुळे पवनी तालुक्याचे ठिकाण व मोठी बाजार पेठ महा विद्यालये असल्यामुळे  शिकायला सायकल ने शाळेकरी विद्यार्थी तसेच शेतकरी शासकीय कामासाठी बाहेरगावावरून ये - जा करीत असतात या खड्ड्यामुळे वाहन चालकाला पाण्याने भरलेल्या खड्यांचा अचूक अंदाज नसल्यामुळे अपघात मोठ्या प्रमाणावर होतात त्यामध्ये कोणाचा जीव सुध्दा जातो तर कोणी विकलांग होतो. म्हणुन  पावसाळा सुरु होऊन सुद्धा खड्डे मय झालेल्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आलेले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तालुकाध्यक्ष भोजराज कांबळी यांच्या नेतृत्वात तहसीलदार सोनुले तहसील कार्यालय पवनी यांच्या मार्फत जिल्हा अधिकारी जिल्हा कार्यालय भंडारा व उपविभाग अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग भंडारा यांना मनसे तर्फे निवेदन देण्यात आले. तहसीलदार सोनुले यांच्या सोबत याबाबत ची चर्चा करून पवनी तालुक्यातील त्वरित रस्त्यावरील खड्डे बुजवण्याबाबद ची चर्चा करण्यात आली.यावेळी तहसीलदार यांनी लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करू असे आश्वासन दिले.निवेदन देतांना उपस्थित मनसे  शहर अध्यक्ष संजय पुरी व्यकुठे, डॉ.भावेश बावकर मनसे जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष, विश्वेष मलोडे  शहर उपाध्यक्ष , राकेश आकरे संघटक , किशोर बारसागडे मार्गदर्शक ,धनराज उपरीकर सचिव , प्रशांत उरकुडकर ,चंदू उकरे , दिपक भेंडारकर ,श्रावण शिवरकर ,प्रदीप वैद्य, गोलू वाकेकर, प्रदीप ब्राह्मणकर ,संजय भेंडारकार, तसेच पवनी तालुक्यातील व शहरातील मनसेचे आदी पदाधिकारी कार्यकर्तेगण होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]