मेंढपाळ पुत्राची एमपीएससी परीक्षेत भरारी - महसूल सहाय्यक पदी नियुक्ती

मेंढपाळ पुत्राची एमपीएससी परीक्षेत भरारी -  महसूल सहाय्यक पदी नियुक्ती
सावली - चांदली बुज. येथील मेंढपाळ कुटुंबातील मुलगा मंगल कन्नावार याने महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्याची महसूल सहाय्यक पदावर निवड झाली आहे. त्याचे सत्कार धनगर समाजाचे वतीने करण्यात आले.
      चांदली बुज. येथील मेंढपाळ शामराव कन्नावार यांचा मुलगा मंगल कन्नावार यांच्या मुलाचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाले.  रमाबाई आंबेडकर विद्यालय सावली येथे माध्यमिक शिक्षण झाले. मंगल यांनी अभ्यासाची आवड व प्रशासकीय सेवेची जिद्द असल्याने अनेकदा प्रयत्न केले पण अपयश येत होते. परंतु प्रशासकीय सेवेत जाण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. सन 2022 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा दिली व नुकताच त्याचा निकाल लागला असून परीक्षेत उत्तीर्ण झाला. त्याची नियुक्ती महसूल सहाय्यक पदावर निवड झाली. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार , व्हिजेएनटी जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार, सरपंच विठ्ठल येगेवार, माणिक पाटेवार शिक्षक, यशवंत यारेवार शिक्षक, सोमेश्वर कंचावार, अनिल अमृतवार, दादाजी कोरेवार यांनी सत्कार केले. 
    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]