सावरी (बिड) येथे कृषी सहायक मापारी यांनी जनजागृती सभेतून शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन

 सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - खडसंगी परीसरामध्ये सोयाबीन कापूस धान तूर इत्यादी पिकाची लागवड केल्या जाते परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये सोयाबीन पिकावर येलो मोजाईक ,उंट अळी, लष्करी अळी,पानावरील बुरशीजन्य ठिपका इत्यादी कीड व रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असल्याने कृषी विभागामार्फत गावोगावी जनजागृती सभेची आयोजन करण्यात येत आहे. सोयाबीन पिकावरील येलो व्हेन मोजाईक या रोगाचा प्रसार रस शोषण करणारी पांढरी माशी या किडीमुळे होतो.मागील कालावधीमध्ये पावसाचा पडलेला खंड तसेच उष्ण तापमान व दमट वातावरण त्याचबरोबर सोयाबीन पिकाची दाट पेरणी व नत्रयुक्त खताचा अधिक वापर इत्यादी बाबी पांढऱ्या माशीची संख्या वाढीसाठी कारणीभूत ठरलेल्या आहेत.त्यामुळे पिवळा मोजाईक झपाट्याने वाढण्याची दाट शक्यता आहे . पिवळा मोजाईक पीक फुलोरा अवस्थेत येण्याच्या अगोदर झाल्यास ९०% पर्यंत नुकसान होऊ शकते तसेच त्यामुळे आपल्या शेतामध्ये सोयाबीन पिकाची चार-पाच झाडे पिवळे झालेली दिसल्यास त्वरित उपटून जमिनीमध्ये गाडून टाकावी. तसेच सोयाबीन पिकावरील काही ठिकाणी लष्करी अळी, उंट अळी, खोडमाशी तसेच पानावरील बुरशीजन्य ठिपके इत्यादी कीड व रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असल्याने आपल्या पिकाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी वेळीच बंदोबस्त करणे आवश्यक आहे. त्यासाठी पांढरी माशीच्या जैविक नियंत्रणासाठी एकरी ६४ पिवळे चिकट,त्याचबरोबर सोयाबीन पिकावरील लष्करी अळी व कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीच्या निरीक्षणासाठी एकरी दोन कामगंध सापळे लावावे तसेच किडी व बुरशीजन्य रोगाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिफारशीत कीटकनाशकाचा व बुरशीनाशकाचा वापर करावा. तसेच कापूस पिकातील समोरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कापूस पिकामध्ये न उमगले फुल म्हणजेच डोमकळी वेचून त्वरित नष्ट करावे तसेच रस शोषण करणाऱ्या किडी साठी निळे चिकट सापळे व पिवळे चिकट सापळे यांचा वापर करावा असे मार्गदर्शन कृषी सहायक मापारी यांनी मौजा सावरी येथे घेण्यात आलेल्या जनजागृती सभेमध्ये केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]