तालुक्यातील गावातील शेतीचे पंचनामे करून नुकसान तात्काळ द्या... प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांची जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी..

तालुक्यातील गावातील शेतीचे पंचनामे करून नुकसान तात्काळ द्या...
 प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांची जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी..


वरोरा....जगदीश पेदाम

तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीमध्ये सोयाबीन पिके असून  झालेल्या मुसळधार पावसामुळे शेगाव,चारगाव तसेच परिसरात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून येलो मोझाक तसेच करपा रोगामुळे  सोयाबीन पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..

तालुक्यातील शेगाव, चारगाव, अर्जुनी, धानोली, दादापूर, मानोरा, कोकेवाडा, किनाळा, आष्टा, परिसरातील  सर्व नदी नाले अतिवृष्टी झालेल्या पावसामुळे ओवर फ्लो वाहून तसेच परिसरातील असलेल्या चारगाव मध्यम प्रकल्प धरणाला महापूर आल्याने पुराच्या पाण्याने महारुद्र रूप प्राप्त करून सर्वत्र पाण्याचे अच्छादन पसरत शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते या महाभयानक पुराणे परिसरातील शेतकऱ्यांचे डोळ्यासमोर असलेले पिके वाहून गेले असताना शेतामध्ये असलेल्या पिकांमधून सावरत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची महागडी औषधी वापरत फवारणी  करत जोपासना केली असता पुन्हा आलेल्या पावसाने पिके नष्ट करत सोयाबीन पिकाला येलो मोझाक व करपा रोगांचे सगळीकडे आच्छादन पसरली असून संपूर्ण सोयाबीन पिकांचे नुकसान झाले आहे,शेतात उभी असलेली पिके नष्ट होत असताना शेतकऱ्यांचा डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या आहे.. त्यामुळेच प्रत्येक गावातील पटवारी यांनी शेतात जाऊन तात्काळ पंचनामे करून तहसील कार्यालय अहवाल सादर करून घ्यावी असा आदेश जिल्हा अधिकारी यांनी शासन स्तराव देण्यात यावे. अशी मागणी प्रहार सेवक अक्षय बोंदगुलवार यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केलेली आहे......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]