जांभुळघाट ते भिसी रोड चे काम निकृष्ट दर्जाचे

पुल तुटून पडण्याच्या मार्गावर 

तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)

चिमुर : - चिमूर तालूक्याती रस्ते,रोड व पुलांचे बांधकाम मोठ्या प्रमाणात करण्यात आले. परंतु यामध्ये मोठया प्रमाणात भष्ठाचार झाल्याचे दिसुन  येत आहे. रोडचे व पुलाचे बांधकाम निकृष्ठ दजाचे झालेले आहेत.त्यातले एक म्हणचे जांभुळघाट ते भिसी जाणाऱ्या रोडचे नवीन बांधकाम आहे.त्यामध्ये जी पुले तयार करण्यात आली त्या मधोमधी चार ते पाच इंचाची ग्याप पडलेली आहे. या ग्याप मुळे कधीही सायकल व मोटर सायकल चा मोठा अपघात होऊ शकतो याची शक्यता नाकारता येत नाही.शाळे विद्यार्थी सायकल ने ये - जा करीत असतात. याकडे कंत्राटदार व अभियंता यांच्या आता पर्यंत ही बाब लक्षात का आली नाही ? अभियंता कश्याची देख-रेख करीत असतात.नुसते बिल काढण्या चे काम करीत असतात का..? असा प्रश्न जनतेला पडला आहे. लोक प्रतिनिधी पुढे कंत्राटदाराणे दबावाखाली तर काम केले नसावे अशीही चर्चा जनतेत रंगली आहे.बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन झालेले निकृष्ट दर्जाचे काम व्यवस्थित करून दयावे व कंत्रादारावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

1 टिप्पणी:

  1. *या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे*


    🚜वाचा बातमी : पोलखोल

    https://www.publicpanchanama.com/2023/09/blog-post_622.html?m=1

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]