चिमूर येथील राजीव गांधी नगर मध्ये तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

श्रीहरी बालाजी देवस्थान चे अध्यक्ष निलमभाऊ राचलवार यांचे हस्ते बक्षीस वितरण

तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - दिनांक.१६/०९/२०२३ ला चिमूर येथील राजीव गांधी नगर मध्ये जय माँ दुर्गा भवानी मंडळाच्या वतीने तान्हा पोळा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करून उपस्थित नंदी बैल धारक बाल गोपाल यांना ईश्वर चिठ्ठी ने बक्षीस वितरण करण्यात आले.तसेच वेशभूषा , नदी बैलाची सजावट , पर्यावरणावर आधारित जनहितार्थ कलाकृती च्या माध्यमातून योग्य संदेश , चंद्रयान ३ ,बळीराजास आत्महत्येपासून बचावणे याबाबत चे जनहितार्थ संदेश कलाकृती च्या माध्यमातून सादर करण्यात आलेल्या नंदी बैलांना कलाकृतीने सजावट करून संदेश देखील देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बक्षीस वितरण प्रसंगी श्रीहरी बालाजी मंदिर चिमूर अध्यक्ष निलमभाऊ राचलवार, योगेश ठुने जय माँ दुर्गा भवानी मंडळ अध्यक्ष , रणदिवे, पंचभाई, विलास मोहिनकर उप संपादक पब्लिक पंचनामा साप्ताहिक वृत्तपत्र , माजी नगरसेविका सौ उषा हिवरकर यांची उपस्थिती होती.तान्हा पोळा यशस्वी करण्यासाठी  योगेश ठुने, शेखर एकोंनकर,राजू कारेकर, बंडू हिवरकर,रामभाऊ करारे ,डॉ पंचभाई, राजेंद्र चांभारे,शामदेव कुरट्कर, शंकर भोपे, इंजी भोपे, बादल दुर्गे, आदिंनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]