आयुष्मान भारत योजना गरीब कुटुंबासाठी नव संजीवनी!कुटुंबातील नाव नोंदणी, नवीन नाव नोंदणी करणे होणार सुलभ.

मुल(प्रकाश चलाख)

आयुष्मान भारत योजना किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे. जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. आयुष्मान भारत योजनेत (PM-JAY)केंद्र सरकार शहर/ग्रामीण भागातील गरीब  कुटूंबांना आरोग्य विमा उपलब्ध करीत आहे. यापुढे केंद्र सरकारच्या सूचनेनुसार बि.आय.एस  संगणकीय प्रणालीत कुटुंबातील सभासदांचे नाव नोंदनी करणे, नवीन नाव नोंदणी करणे इत्यादी कामे नागरिकांना करावी लागणार आहेत.

    
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) अंतर्गत आयुष्यमान भारत योजना देशभरात चालवली जात आहे. भारत सरकारच्या या योजनेंतर्गत देशातील १० कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ मिळेत आहे. यासाठी नागरिकांना आयुष्मान भारतचे कार्ड बनवावे लागते. त्यासाठी काही आवश्यक पात्रता निर्धारित करण्यात आली आहे. पात्र नागरिक हे कार्ड बनवू शकतात आणि शासनमान्य दवाखान्यात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळवू शकतात.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'प्रधानमंत्री जन आरोग्य' योजनेची (आयुष्मान भारत योजना ) घोषणा केली आहे. ही योजना पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर २०१९ पासून देशभर लागू करण्यात आली. सरकार एबीवायच्या माध्यमातून गरीब, उपेक्षित कुटूंब व शहरी गरीब कुटूंबातील सदस्यांना आरोग्य विमा उपलब्ध करीत आहे.

सामाजिक-आर्थिक जाती जनगणना (एसईसीसी) २०११ नुसार ग्रामीण  आणि शहरी भागातील कुटूंबे आयुष्मान भारत योजनेच्या कक्षेत आली आहेत.
आयुष्मान भारत योजनेत (ABY) प्रत्येक कुटंबाला प्रतिवर्ष पाच लाख रुपयांचा वैद्यकीय विम्याचा लाभ मिळत आहेत. २००८ मध्ये  सरकारने सुरू केलेल्या राष्ट्रीय आरोग्य विमा योजना (NHBY) आयुष्मान भारत योजना (PM-JAY) योजनेत विलीन करण्यात आली आहे.


SECC च्या आकडेवारीनुसार आयुष्मान भारत योजनेत (PM-JAY) लोकांना आरोग्य विमा मिळत आहे. एसईसीसीच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील D1, D2, D3, D4, D5 आणि D7 कॅटेगरीतील लोक आयुष्मान भारत योजनेत सामील करण्यात आले आहेत.

"2011 च्या जनगणनेनुसार पात्र नागरिकांनाच  सरकारकडून आयुष्यमान भारत योजनेचा लाभ दिल्या जात होता. अनेक नागरिकांचे 2011 च्या जनगणनेनुसार यादीत नाव समाविष्ट नसल्याने आयुष्यमान भारत योजने पासून राज्यातील बरेच कुटुंब वंचित होते. सरकारच्या नवीन निकषानुसार सर्व वंचित नागरिकांना यापुढे आयुष्यमान भारत योजनेत नाव समाविष्ट करण्याचे आवाहन करण्यात येत आहे."

कुटुंबातील प्रत्येक नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे हा शासनाचा हेतू असून कोणत्याही नागरिकांना आर्थिक परिस्थितीनुसार गंभीर आजारात कोणतीही इजा होऊ नये म्हणून शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याचे योजने अंतर्गत धोरण आहे. शासना च्या निकषानुसार सर्व नागरिकांचे यापुढे आयुष्यमान भारत योजननेत कुटुंबातील सदस्यांचे नाव नोंदणी करणे, नवीन नाव नोंदणी करणे इत्यादी कामे सरकारच्या बि.आय.एस. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून होणार आहेत.

"2011च्या जनगणनेनुसार आयुष्यमान भारत योजनेत कुटुंबातील काही सदस्यांची नावे नव्हती.त्यामुळे त्यांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळत नव्हता. आता शासनाने कुटुंबातील नाव नोंदणी,नवीन नाव नोंदणी करून लाभ घेण्याचे  आवाहन केले आहे. गरीब लोकांसाठी वैद्यकीय उपचारासाठी कठीण प्रसंगात आयुष्यमान भारत योजना लाभदायक ठरत आहे."

श्री.राजू मारोती वैरागडे
लाभार्थी, चिचाळा ता.मुल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]