गडचिरोली पोलीस भरतीतील बोगस झाडे ची नियुक्ती रद्द करा - धनगर समाज संघर्ष समितीचा आमरण उपोषणाचा

गडचिरोली पोलीस भरतीतील बोगस झाडे ची नियुक्ती रद्द करा -  धनगर समाज संघर्ष समितीचा आमरण उपोषणाचा
गडचिरोली - पोलीस शिपाई पद भरती मधील भटक्या जमाती (क) प्रवर्गातील बोगस झाडे उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची नियुक्ती करण्यात यावी या मागणिकरिता   पोलीस अधीक्षक व जात पडताळणी समिती गडचिरोली यांचेविरोधात बेमुदत उपोषणाचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
     गडचिरोली जिल्ह्यात झाडें कुणबी ही जात फार मोठ्या प्रमाणात असून इतर मागास प्रवर्गात येते. परंतु झाडें कुणबी या जातीतील कुणबी हा शब्द वगळून धनगर व तत्सम जातीतील अनुक्रमांक 15 वरील झाडें या पोटजातीचा आधार घेऊन स्वतःला भटक्या जमाती (क) प्रवर्गातील असल्याचे दाखवून खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे पोलीस भरतीमध्ये नियुक्त झालेले आहेत.
      गडचिरोली पोलीस भरती 2021 मध्ये निशांत परशुराम गोटेवार, श्रीकृष्ण  दशरथ दुबलवार, समृद्धी किसन पुरकलवार या बोगस झाडें उमेदवारांची भटक्या जमाती (क) प्रवर्गातून निवड झालेली आहे. याबाबत पोलीस अधीक्षक गडचिरोली यांचेकडे आक्षेप घेऊन जात पडताळणी प्रमाणपत्राशिवाय सेवेत रुजू करू नये अशी मागणी केली होती. परंतु त्यांना रुजू करून घेण्यात आले. मात्र जात पडताळणी समिती सदर उमेदवारांचे जात वैद्य/अवैद्य न ठरविता बोगस उमेदवारांना अभय देत आहे. 10 महिन्याचा कालावधी होऊनही जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करू शकले नसल्याने त्यांना नियमानुसार बडतर्फ करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती द्यायला पाहिजे परंतु अजूनही ही  कारवाई न करता खऱ्या उमेदवारांवर पोलीस अधीक्षकांकडून अन्याय होत आहे. 
    गडचिरोली पोलीस भरती 2022 मध्ये अशाच पद्धतीने एन.टी. (सी) प्रवर्गात विनोद रोहिदास मंतकवार, सचिन देवराव मादावार, सुभाष जनार्धन गुटेवार, विजय लक्ष्मण ओडेंगवार, कोमल शिवराम ओडेंगवार, मंगला लक्ष्मण मंतकवार, पालेश्वरी साईनाथ मुलकलवार, शुकला तुळशीराम येलमुले, आचल चिनू चौधरी, मीना तुळशीराम शेट्टीवार या  बोगस झाडे कुणबी उमेदवारांची निवड यादीत नावे आली होती. या यादीवर आक्षेप घेत जात वैद्यता प्रमाणपत्र अवैद्य ठरविण्यात आलेल्या उमेदवारांची पुराव्यासह प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी व धनगर समाज संघटनानी आक्षेप घेतल्यानंतर मान. पोलीस अधिक्षक गडचिरोली यांनी त्यांना रुजू करून घेतलेले नाही. मात्र सचिन मादावार व पालेश्वरी मुलकलवार यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैद्य झाले असतांनाही त्या बोगस उमेदवारांवर गुन्हे दाखल करून नियुक्ती रद्द करण्यात आलेली नाही व इतरांचीही 4 महिने कालावधी होऊनही जात पडताळणी प्रस्ताव दाखल केलेले नाही. 
      त्यामुळे भटक्या जमाती (क) प्रवर्गातील प्रतीक्षा यादीतील उमेदवार खालील मागण्या आठवडाभरात पूर्ण न झाल्यास गडचिरोली पोलीस भरती 2021मध्ये  नियुक्त झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या उमेदवारांना बडतर्फ करण्यात यावे. गडचिरोली पोलीस भरती 2022 मध्ये निवड झालेले भटक्या जमाती (क) प्रवर्गातील उमेदवार ज्यांची जात वैधता रद्द झालेली आहे त्यांची निवड रद्द करण्यात यावी, भटक्या जमाती (क) मधील बोगस झाडें उमेदवारांचे जात पडताळणी समितीने तात्काळ करावी, गडचिरोली पोलीस भरतीतील प्रतीक्षा यादीतील खऱ्या भटक्या जमाती (क) उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात यावे या मागण्या आठवड्याभरात निकाली न निघाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसह गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आला.
     यावेळी धनगर समाज संघर्ष समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष डॉ. तुषार मर्लावार, विजय कोरेवार, प्राची मेडेवार, मोरेश्वर पाटेवार, राहुल अन्नावार, अमोल सिद्धमवार, गणेश देवेवार, खुशाल मल्लेलवार, सुभाष मेडेवार, खुशाल अन्नावार उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]