मूल पोलीसांची कारवाईमूल (प्रतिनिधी) : 
सावली कडुन चंद्रपूरकडे जनावरांना वाहनात कोंबुन नेत असताना मूल पोलीसांनी वाहन पकडुन वाहनातील सुमारे 33 जनावरांची सुटका करून लोहारा येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे. सदर कारवाई गुरुवारी रात्रौ 3 वाजता दरम्यान केली आहे. 

चंद्रपूर जिल्हयातुन मोठया प्रमाणावर गोवंशीय जनावरांची तस्करी केली जात आहे, दरम्यान गुरुवारी रात्रौच्या दरम्यान ट्रक मध्ये गोवंशीय जनावरांना कोंबुन मूल वरून चंद्रपूरकडे नेत असल्याची गोपनिय माहिती मूल पोलीसांना मिळाली होती, माहितीच्या आधारे मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गर्शनाखाली मूल परिसरात नाकाबंदी केली होती दरम्यान सावली वरून मूल मार्ग चंद्रपूर जाणारे ट्रक क्रं. ए पी 29 टी बी 4739 या वाहनाला मूल पोलीसांनी थांबवुन वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनात सुमारे 33 गोवशीय जनावरे बैल व गाय आढळुन आल्या, सदर गोवंशीय जनावरांची अंदाजे किंमत 2 लाख 31 हजार तर गुन्हा वापरण्यात आलेल्या ट्रक ची अंदाजे किंमत 20 लाख रुपये असा एकुण 22 लाख 31 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. आरोपीविरुध्द मूल पोलीसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 
सदर वाहनातुन सुटका केलेल्या 33 जनावरांना लोहारा येथील गोशाळेत पाठविण्यात आले आहे.
पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक सतिश बनसोड, पोलीस हवालदार कातकर, चिमाजी, राकेश, शफीक शेख करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]