साहेब, तुम्ही एकदा तरी या "मायनर" ने या बरं ! शेतकर्यांची आर्त हाक.( रहदारी असणाऱ्या घोडाझरीच्या नांदगाव मायनरचे बेहाल . )
सावरगाव:
      नागभीड तालुक्यातील घोडाझरी तलावांतर्गत नांदगाव कडे जाणाऱ्या मायनरचे तर बेहाल आहेतच परंतु या मायनर ने रहदारी करण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांचे बेहाल झालेले आहे सर्वसामान्यांसाठीच नव्हे तर शेतकऱ्यासाठी  अतिशय आवश्यक असणाऱ्या रस्त्याचे प्रशासनाला  सोयर सुतक नसल्याने बेहाल झालेले आहेत. चारचाकी वाहन तर सोडाच पण पायदळ चालणे ही मुश्किल होत आहे त्यामुळे साहेब तुम्ही एकदा तरी या मायनर नाही या बरं !  असा प्रश्न घोडाझरी   सिंचाई विभागाचे  समंधीत विभागाला  शेतकरी वर्ग करीत आहे. . नागभीड तालुक्यातील  कोजबि  मायनर पासून ते नांदगाव पर्यंत मायनर ने जाणाऱ्या रस्त्याचे बेहाल  झाले असून त्यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे.
घोडाझरी तलाव ठेकेदारीत  जाण्यापूर्वी माती काम करून मायनरवर मुरूम टाकून दुरुस्त केल्याची माहिती आहे परंतु शासनाच्या ठेकेदारी धोरणाने शासन व प्रशासन यांच्या  सहमतीने "कुरघोडी" शेतकऱ्यांवर होत आहे  असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे तसेच मागील कित्येक वर्षापासून या मायनर  बेहाल असूनही  शेतकऱ्यांना जाण्या-येण्यायोग्य नसतानाही पावसात कमालीचा त्रास होत असूनही  लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत असल्याचा  प्रकार दिसत असल्याने शेवटी शेतकऱ्यांनी हा गंभीर प्रश्न कोणाकडे मांडावा असा प्रश्न निर्माण होत आहे  . ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या ठिकाणी उन्हाळ्याचे दिवसात  मुरूम टाकून दुरुस्त करणे अपेक्षित होते परंतु ते दुरुस्त न केल्यामुळे व ऐन पावसाळ्यात नहाराचा उपसा केल्याने पावसामुळे रस्ता पूर्णपणे चिखलमय झाला आहे. या रस्त्यावरून मोटरसायकल, सायकल यांना जाता तर येतच नाही परंतु पायदळ चालणे कठीण झालेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]