वाढोणा येथे श्री चक्रपाणी प्रभू ग्रामस्वच्छता अभियान
आचरणशिल समाजनिर्मितीच्या कृतीशील उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन 

ग्रामस्वच्छतेचे आद्य प्रणेते महानुभाव धर्माचे तिसरे अवतार श्री चक्रपाणी प्रभू महाराज (कार्यकाल १०४२ ते ११४३) यांनी सुमारे ९०० वर्षांपूर्वी हातात सूप व खराटा घेऊन वयाचे ६३ वर्षे अविरतपणे ग्रामस्वच्छतेचे कार्य केले. त्यांच्या या महान ग्रामस्वच्छता विषयक कार्याची माहिती प्रत्यक्ष आचरणाद्वारे जणमाणसांत रुजविण्यासाठी तसेच त्यांच्या जिवोद्धारक व समाजोद्धारक विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व परिसर द्वारा राज्यस्तरीय श्री चक्रपाणी प्रभू ग्रामस्वच्छता अभियान - २०२३  हा कृतीशील उपक्रम मागील १० वर्षांपासून संपूर्ण राज्यभरातील विविध गावांत राबविण्यात येत आहे. 
बुधवार दि.२७/०९/२०२३ ला श्री गोविंद प्रभू अवतरणदिनाचे औचित्य साधून मौजा.वाढोणा ता.नागभिड जि.चंद्रपूर येथे महानुभाव महिला व पूरूष मंडळ वाढोणा यांच्या सहकार्याने राज्यस्तरीय श्री चक्रपाणी प्रभू ग्रामस्वच्छता अभियान राबवून श्री चक्रपाणी महाराजांच्या ग्रामस्वच्छता विषयक कार्याबद्दल माहिती सांगून जनजागृती करण्यात आली. श्रीदत्त मंदिर येथून ग्रामस्वच्छता अभियानाला सुरुवात करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, ग्रामपंचायत कार्यालय, अहिल्याबाई होळकर चौक, ग्रामीण रुग्णालय तसेच संपूर्ण गावात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले.
 यावेळी सर्वज्ञ विचारमंचचे पदाधिकारी प्रशांत रामटेके, निकेश अलोने, तृषाल रामटेके, दत्तू गोंगले, जितेंद्र रामटेके, वैभव गणविर, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज बन्सोड, डॉ. अभिजीत बनपूरकर  तसेच महानुभाव महिला मंडळ व मल्हार सेना मंडळ वाढोणा येथील संपूर्ण कार्यकर्ते व गावकरी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या स्वच्छता अभियानात सहभाग घेतला.
संपूर्ण राज्यभरातील विविध सामाजिक व आध्यात्मिक संस्था संघटना व मंडळानी आपल्या गावात व परिसरात स्वच्छता अभियान राबवून आचरणशिल समाजनिर्मितीच्या कृतीशील उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सर्वज्ञ विचारमंच तर्फे करण्यात येत आहे. 
या राज्यस्तरीय स्वच्छता अभियानाचा समारोपीय सोहळा कुही तालुक्यातील मौजा विरखंडी जि.नागपूर येथे दि.५ व ६ नोव्हेंबर ला नामवंत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]