वनविभाग,वन समितीमार्फत शिक्षक दिनी शाळेला कँम्प्युटर, प्रिंटर ची भेट...
वरोरा....जगदीश पेंदाम

तालुक्यातील येत असलेल्या तसेच ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोअर जंगलालगत असलेल्या अर्जुनी तुकून गावातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला वनविभाग, गावातील वन समितीमार्फत, शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला असुन शिक्षक दिनाचे औचित्य साधून वनविभाग,वन समितीमार्फत कँम्प्युटर व प्रिंटरची शाळेला भेट देण्यात आली..
यावेळी कार्यक्रम वेळी अध्यक्ष स्थानी आदिवासी सोसायटी उपाध्यक्ष चारगाव अभिजीत पावडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून दशरथ देहारकर, क्षेत्र सहाय्यक सोनेगाव संभाजी नन्नावरे, वनरक्षक निरंजन जुडे,ममता राजगडे, प्रणय कोसूरकर ,वन समिती अध्यक्ष प्रकाश हनवते, शाळा समिती अध्यक्ष सुनील बोढे, शाळेचे मुख्याध्यापक कुडमेथे सर, शिक्षक रेवतकर सर तामगाडगे सर, बुजाडे,गैरकर,लिटकर मॅडम, यांच्या हस्ते भेट देण्यात आली, या कार्यक्रमाचे संचालन तामगाडगे सर यांनी केली असून आभार प्रदर्शन मुख्याध्यापक कुडमेथे सर यांनी केले. यावेळी  शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व गावातील नागरिक उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]