गडीसुर्ला येथील जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम :"संवाद मनामनाचा" विद्यार्थ्यांनी साधला साहित्यिकांशी संवाद


       शासन  दप्तराविना शाळा या उपक्रमाचे आयोजन प्रत्येक शाळेत काही वर्षापासून राबवित आहे. त्याच उपक्रमांतर्गत पंचायत समिती मुल मधील गडीसुर्ला येथील जिल्हा परिषद शाळा विद्यार्थी कट्टा आयोजित "संवाद मनामनाचा" हा अनोखा कार्यक्रम  राबवित आहे. या कार्यक्रमा अंतर्गत याच शाळेतील सातव्या वर्गातील विद्यार्थिनी श्रावणी मोहूर्ले ही प्रत्येक महिन्याला विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या मान्यवरांशी मुलाखतिद्वारे संवाद  साधणार आहे. याअंतर्गत आलेल्या प्रत्येक मान्यवरांचा सुरवातीला ऑटोग्राफ घेतला जातो , नंतर त्यांच्या कार्य -कर्तृत्वातून प्रेरणा देणारे मार्गदर्शन मिळविण्यासाठी विविध प्रश्न विचारले जातात . नुकत्याच आज पार पडलेल्या या कार्यक्रमात कवी , समीक्षक , कथालेखक लक्ष्मण खोब्रागडे तसेच कवयित्री वृंदा पगडपल्लीवार या दोन साहित्यिकांची मुलाखत श्रावणी मोहूर्ले हिनेआपल्या सुंदर नियोजनबद्ध शैलीमध्ये घेतली. अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्नातून यशस्वीततेचे गमक जाणून घेतले . या उपक्रमाचे सर्व स्तरातून  कौतुक होत आहे. शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टिकले यांनी उपक्रमाबद्दल सांगताना म्हटले की , शाळेत विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देऊन सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनाने विविध उपक्रमाचे आयोजन प्रत्येक शनीवारला केल्या जाते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव दिले जातात. त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा या हेतूने असे उपक्रम घेतले जातात. अशा विविध उपक्रमातूनच विद्यार्थी हे घडत असतात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील मत्रिमंडळ तसेच सुरेश टिकले मुख्याध्यापक, राजेंद्र चौधरी  अविनाश श्रीगुरवार , विजय दुधे, शीतल धकाते, स्मिता सायरे , नवनीत कंदालवार ,प्रशांत कवासे या सर्व शिक्षक वृंदानी मेहनत घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]