राज्य शासनाचा पुरस्कार हा तर माझ्या शाळेतील मुलांचा सन्मान, ऊर्जा वाढली"शिक्षक संतोष नन्नावार यांची भावना.          (मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,मा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, म
आमदार मंगलप्रभात लोढा,आमदार कपिल पाटील,शिक्षणआयुक्त सुरज मांढरे,शिक्षण विभागाचे सर्व संचालक, उपसंचालक यांचे उपस्थितीत प्रमुख उपस्थितीत मा.शिक्षणमंत्री दीपक केसकर, यांचे शुभहस्ते टाटा नॅशनल सेंटर परफॉर्मिंग आर्ट, नरिमन पॉईंट मुंबई येथे पुरस्कार व मानपत्र  प्रदान करण्यात आले)
*तळोधी(बा)* :
              सिंदेवाही येथील मूळ रहिवासी संतोष दामोधर नन्नावार हे लोकविद्यालय तळोधी(बा) ता: नागभीड येथे सहशिक्षक पदावर कार्यरत आहेत.
परिसरात इंग्रजी शाळांशी स्पर्धा करत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्यास सुरुवात केली. कोरोना कालावधीत 2 रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर अंतर्गत कोविड १९ च्या कालावधीमध्ये 'शाळा बंद पण शिक्षण सुरु' या उपक्रमांतर्गत online ई-साहित्य निर्मितीत सहभाग, कोरोना कालावधीत महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित ऑनलाइन उपक्रमात विद्यार्थ्यांना 100% सहभागी करून घेतले.
विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी सोडवण्यासाठी अभ्यासतंत्र कार्यशाळा व ऑनलाइन वेबिनार चे आयोजन.कोरोना कालावधीत जिल्ह्यातील अनेक शाळेतील शिक्षकांना तंत्रस्नेही प्रशिक्षणाचे मार्गदर्शन केले.समृद्ध पर्यावरण रक्षणासाठी शाळेच्या परिसरात व तळोधी(बा) या गावात वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचे कार्य,राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले.कोरोना कालावधीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी" शिक्षण आपल्या दारी"हा उपक्रम राबविला.
गरजु व होतकरू विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून ग्रंथालय, विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेचा शोध घेत स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन,विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी वाचन कट्टयाची निर्मिती,
 जिल्हा परिषद चंद्रपूर ( शिक्षण विभाग) व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था चंद्रपूर द्वारा मिशन गरुडझेप २०२१ अंतर्गत सुपर ६० मध्ये सदस्य , पल्स पोलिओ अभियान, 'बेटी बचाव बेटी पढाओ', गोवर रुबेला लसीकरण, कोविड लसीकरण जनजागृती इ. उपक्रमात सहभाग घेऊन राष्ट्रीय कार्यात मदत केली.
          त्यांनी आपल्या सन्मानाचे श्रेय आई-वडील, विद्यार्थी, पालक, यांना दिले. मित्र परिवार व, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी लोकविद्यालय यांनी अभिनंदन केले आहे.
"कोरोना कालावधीत 2 रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन,महाराष्ट्र शासनाच्या नवोपक्रम स्पर्धेत २०१९-२० मध्ये संतोष नन्नावार यांना नवोपक्रमास चंद्रपूर जिल्ह्यात उत्कृष्ट नवोपक्रम म्हणुन पारितोषिक मिळाले आहे.त्यांची शैक्षणिक व संशोधनपर विषयावर राष्ट्रीय व राज्य स्तरावर  लेख प्रकाशित आहेत. प्रयोगशील शिक्षक, तंत्रस्नेही, लेखक, कवी,उत्तम निवेदक असलेले म्हणतात,या पुरस्काराने माझी शैक्षणिक उर्जा आणि जबाबदारी वाढली आहे." - संतोष नंनावार.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]