डोणी येथे रक्तरंजीत पोळा, वृध्दाचा खून

मुल पोलीसानी खुनाचे गुन्हयातील आरोपीला केली तात्काळ अटक murder
crime murderमूल पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डोणी येथे अमृत बाजीराव अलाम वय अंदाजे 60 वर्ष यांचा खुन झाल्यांने, सर्वत्र खळबळ उडाली.  पोलिसांनी आरोपीस तत्काळ अटक केली असून, तपास सुरू केला आहे. खुनाचे कारणांचा अजून उलगडा झालेला नाही
पोलीस स्टेशन मुल येथे दिनांक १५/०९/२३ रोजी फिर्यादी नामे श्रीमती अण्णपुर्णाबाई अमृत अलाम वय ५५ वर्षे, जात गोड धंदा शेती रा. डोनी ता. जि. चंद्रपूर हिने तक्रार दिली कि, सकाळी ०८/०० वा. दर. फिर्यादीचे पती मृतक नामे अमृत बाजीराव अलाम वय ६० वर्ष हे शेतावर शेत पाहण्यास गले व अंदा. १०/०० वा. परत आले. व आंघोळ करून जेवण केले. त्यानतंर दुपारी ०३/०० वा. दर. मृतकचे लहान भाऊ भिमराव अलाम त्याचे घराकडे गेले. व सायंकाळी ०५/०० वा. परत आले. पोळा सण असल्याने ते गावातील हनुमान मंदिराजवळ पोळा पाहाण्यास गेले. पोळा सुटल्यानतंर काही वेळाने घरी परत आले. तेव्हा पुतण्या जालिन्द्र भिमराव अलाम हा बैलजोळी घेवुन घरी आला तेव्हा फिर्यादी व मृतक मिळुन बैलाची पुजापाठ केली. नतंर पुतण्या बैलजोळी फिर्यादी चे घरी बांधुन तो आपले घराकडे गेला. रात्री अंदाजे ०७/०० वा. दर. मृतक हा चुलत भाऊ नामे मंगरू अलाम याला फोन लावतो म्हणुन मोबाईल घेवुन समाज मंदिराकडे गेला. परंतु बराच वेळ झाला तरी फिर्यादीचा पती घरी आला नाही. अंदा. ०८/०० वा. ते ०८/३० वा. दर. फिर्यादीचे घराजवळ राहणारा मनोज देवीदास नैताम व विकास मधुकर अलाम हे दोघेही फिर्यादीचे घरी येवुन फिर्यादीला सागितले की, तुझा घरवाला समाज मंदिराजवळ पडुन आहे. असे सांगितल्यावरून फिर्यादीने   भिमराव अलाम याचे घरी जावुन माहिती दिली. व त्यांचे सोबत इतर गावातील लोक मिळुन समाज मंदिरजवळ जावुन पाहीले असता फिर्यादीचे पती गावाबाहेरील असलेल्या समाज मंदिराचे पायरीजवळ टेकुन पडलेले दिसले. तेव्हा जवळ जाउन बॅटरीचे उजेडात पाहीले असता मृतकचे चेह-यावर कशाने तरी मारल्याच्या जखमा दिसल्या व पाढ-या दुपटट्याने दोन्ही हात पाठीमागे बांधुन त्याच दुपटट्याने गळ्याला आवळून बांधले दिसले. व मृतक जिभ दातात चावलेली दिसली फिर्यादीचे पतीस कोणीतरी अज्ञात इसमाने गावातील समाजमंदिराजवळ दोन्ही हात पांढ-या दुपटट्यांने पाठीमागे बांधुन गळा आवळुन मारहाण करून जिवानिशी ठार मारले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट अप क. ३५२ / २०२३ कलम ३०२ भा.द.वि गुन्हा नोंद करून तपासात घेतला

सदर गुन्हयाचा तपास  पोलीस अधिक्षक साहेब, रविन्द्रसिंह परदेशी,  अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु,  उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लीका अर्जुनइंगळे याचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी पो स्टाफचे मदतीने तात्काळ सदर गुन्हयातील आरोपीचा छळा लावुन आरोपी नामे विजयपाल गोविदराव अलाम वय २५ वर्ष जात गोंड रा. डोनी ता. जि. चंद्रपूर यास सदर गुन्हयात अटक करण्यात आली असुन सदर गुन्हाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी सा. करीत असुन सदर गुन्हयाचे तपासा करीता सपोनि सतिश बनसोड, पोउपनि मोरे, गेडाम, सफी उत्तम कुमरे, राधेश्याम यादाव पोहवा ताणु रायपुरे नापोअ सचिन सायंकार, चिमाजी देवकते, भोजराज मुडरे, पोअं शफीक शेख, आतिश मेश्राम यानी अतिक परिश्रम घेवून सदर गुन्हयातील आरोपीचा छठा लावुन अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]