ग्राम पंचायतीचा निधी रम्मी खेळात उडविणार्यांवर कारवाई करण्याची मागणी


 

14 व्या वित्त आयोगाच्या पैशानी रमी खेळून गैरव्यवहार करणारे किशोर पाटेवार या संगणक परिचालकांसह दोषीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जुनासुर्ला येथील ग्रामस्थानी आज प्रेस क्लबच्या पत्रकार परिषदेतून केली.  याबाबतचे निवेदन ग्रामस्थानी मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी यांना दिल्यांचे सांगीतले.

जुनासुर्ला ग्राम पंचायतीचे संगणक परिचालक किशोर पाटेवार यांनी, गावच्या विकासाकरीता आलेले 14 व्या वित्त आयोगाचे 8 लाख 63 हजार रूपये आॅनलाईन रम्मीच्या खेळात उडविले.  याबाबत वर्तमानपत्रात बातमी प्रकाशीत होताच, गावात खळबळ माजली.  जुनासुर्लाचे ग्रामसभेत ग्रामस्थानी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर, सरपंच व ग्रामसेवकांनी ही माहिती खरी असल्यांचे सांगत, संबधितांकडून पैसे वसुल केल्यांचे सांगीतले.

एवढी मोठी रक्कम गहाळ होत असतांना, सरपंच आणि ग्रामसेवकांचे दुर्लक्ष कसे झाले असा प्रश्न करीत, या प्रकरणाची चौकशी करून सर्व दोषीवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी या ग्रामस्थानी केली आहे.  पत्रकार परिषदेत प्रविण येग्गेवार, दिलीप भुमलवार, मारोती कंकलवार, गौरव रामेवार, संकेत अंकिलवार, अतुल लोढेल्लीवार, रपेश कंकलवार उपस्थित होते.

संगणक परिचालक किशोर पाटेवार यांचेबाबत गावात विविध तक्रारी असून, घरकुलाचे लाभ देण्याकरीता, विविध दाखले देण्याकरीता पैशाची मागणी करीत असल्याचाही आरोप गावकर्यांनी पत्रकार परिषदेत केला.

रक्कम वसुल झाली

याबाबत सरपंच रणजीत समर्थ यांची प्रतिक्रिया घेतली असता, सदरर्हु घटना खरी असल्यांचे मान्य करीत, संबधितांकडून पूर्ण रक्कम वसुल करून, ती ग्राम पंचायतीच्या खात्यात जमा केल्यांचे सांगीतले. ग्राम पंचयतीचा पासबुक हरविला आहे, 14 व्या वित्त आयोगाच्या रक्कमेच्या विनीयोगाचा ओटीपी येत नाही.  विश्वासाने सरपंच आणि ग्राम सेवक यांचे डिजीटल सिग्नीचर संगणक परिचालक यांचेकडे दिल्यांचे हा गैरव्यहार झाल्याची कबुली त्यांनी दिली.  येत्या मासिक सभेत यावर चर्चा करून, पुढील कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्यांचे त्यांनी सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]