शूरवी महाविद्यालयामध्ये स्वयंशासन कार्यक्रम तसेच शिक्षक दिन उत्साहात साजरा
शूरवी महिला महाविद्यालय मुल येथे डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीचे अवचित साधून शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वयंशासन स्पर्धेत भाग घेत उत्कृष्ट प्रतिसाद देत विविध विषयांचे अध्यापन केले तसेच एक दिवशीय महाविद्यालयामधील प्राचार्य प्राध्यापक व परिचर इत्यादी पदग्रहण करून योग्यरीत्या कार्यभार सांभाळत भूषविला. या कार्यक्रमाला उपस्थित श्री.मा.राजेश सुरावर सचिव श्री. माता कन्यका सेवा संस्था तथा प्रमुख श्री.मा.जीवनभाऊ कोणतमवार सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद ठाकूर व इतर अतिथीगण यांचे मोलाचे मार्गदर्शन आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना गुरुकृपेने प्राप्त झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय हर्षा खरासे प्रभारी प्राचार्य सुरभी महाविद्यालय मुल यांनी सुद्धा आपले कृतज्ञतापूर्वक मनोगत व्यक्त केले. तसेच यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संपूर्ण व्यवस्थापन व संचालन स्वतः विद्यार्थ्यांनी केले यातूनच होतकरू विद्यार्थ्यांचे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]