पेंढरी ग्रामसेवकाची मुजोरी - फेरफारसाठी द्यावे लागतात पैसे गावकऱ्यांची पंचायत समितीकडे तक्रारसावली - 
पेंढरी येथील ग्रामसेवक व शिपाई हे जागेचे फेरफारसाठी नागरिकांकडून पैसे घेऊन आर्थिक लुबाळणूक करीत असल्याची व इतर प्रकरणात ग्राम पंचायत सदस्य व जनतेला न जुमानता मुजोरी करीत असल्याची तक्रार पंचायत समितीला देत कारवाई करण्याची मागणी केली आहे.
      घरकुल व इतर कामासाठी घराचे रेकॉर्डची आवश्यकता असते. मात्र सावली तालुक्यातील ग्रामपंचायत पेंढरी येथील ग्रामसेवक कुरेकार व शिपाई जितेंद्र कोरगंदेवार हे याचाच गैरफायदा घेत नियमबाह्यरित्या प्रत्येकी 4 हजार, 5 हजार रुपये वसुली करीत आर्थिक लुबाळणूक करीत असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीत जे पैसे देत नाही त्यांचे फेरफार प्रलंबित असल्याचे नमूद केले आहे. मासिक सभेत जमा खर्च हिशोब न देणे, मासिक सभेत फेरफार अर्ज न ठेवणे, आदिवासी कुटुंबांना शबरी आवास अर्ज भरणेसाठी ठराव न देणे, विधवा महिलांशी उद्धट बोलणे अशा तक्रारी केल्या आहेत. सदर तक्रार पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांचे नेतृत्वात ग्रामपंचायत सदस्या अंजु बोरेवार, विवेक मुप्पावार, कुसुम गावळे, लखन मेश्राम, अशोक अलाम, पुंडलिक गावळे, संतोष उईके, शरद मडावी, चेपटू गावळे, अरविंद गावळे, आशिष गावळे, ललिता कुमरे, शांताबाई तोडासे, सुषमा कन्नाके, सुखदेव कुमरे, मनोज गावळे आदी गावकऱ्यांनी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी वासनिक यांचेकडे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]