समाज संस्कृती विकास बहुउद्देशीय संस्था नागपूर यांचा भिसी नगर पंचायतीत भोंगळ कारभार जिल्हाधिकारी यांना भाऊराव ठोंबरे चिमूर विधानसभा समन्वयक यांनी दिले निवेदन

मुख्याधिकारी सुप्रिया राठोड तसेच प्रशासक प्राजक्ता बुरांडे मॅडम यांची ठेकेदाराशी साठगाठ

उप संपादक
विलास मोहिनकर

चंद्रपूर : - नगर पंचायत भिसी चा साफसफाईचा ठेका समाज संस्कृती विकास बहुउद्देशिय संस्था नागपूर यांना हा ठेका अंदाजे ४७ लाखात झाला असून ते  मागील काही महिन्या पासून कार्यरत आहे.परंतु सफाई कामगार यांची क्षमतेपेक्षा कमी भरती करून अवघ्या पाच ते सहा सफाई महिला कामगार व कचरा गाडीवर काही युवक कामगार असून यांचे कडून अनियमित पणे सफाई करून घेतली जात आहे.त्याच प्रमाणे भिसी येथील नाली उपसा मे महिन्यात पावसाळ्याच्या सुरुवातीला व्हायला पाहिजे तो सुद्धा झाला नाही. पावसाचे मुसळधार पाऊस आल्यावर नालीतील कचरा, घाण  व मलभा वाहून जाईल ज्या ठिकाणी कचरा अडकला त्या ठिकानाहुन कचरा काढायचा व नाली उपसा दाखवायचा व नाली उपसण्याची पूर्ण रक्कम खिश्यात कशी येईल हा या संस्थेचा उद्देश दिसून येत आहे.
हे सर्व प्रकरण घेऊन काही युवक, समाजकार्यकर्ते, मुख्याधिकारी यांचेकडे तक्रारी घेऊन गेले असता त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर न देता त्यांना हाकलून लावल्या जाते.तुम्ही विचारणारे कोण? असा संतप्त सवाल नागरिकांना मुख्याधिकारी यांचे कडून ऐकण्यास मिळत आहे.त्याचप्रमाणे सदर संस्थेचे ठेकेदार सफाईच्या कामासाठी भिसी नगरपंचायतीच्या प्रापर्टीचा वापर करीत असून सफाई कामगार पुरुष व महिला यांचेकडून कमी पैशात काम करऊन घेतल्या जाण्याची दाट शक्यता यात दिसून येत आहे. त्यामुळे या संदर्भात मुख्याधिकारी व प्रशासक यांना माहिती देऊनही कोणतीही कारवाई संबंधित ठेकेदारविरुद्ध होत नसल्यामुळे व त्यांची देयके देण्यात येऊ नये अशी तक्रार जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचे कार्यालयात भिसी चे नागरिक व शिवसेना पक्षाचे चिमूर विधानसभा समन्व्यक भाऊराव ठोंबरे यांचे कडून दि.7/8/2023 रोजी करण्यात आली आहे.

---------------------------------------------------

मुख्याधिकारी सुप्रिया राठोड व प्रशासक प्राजक्ता बुरांडे मॅडम यांना भेटण्यासाठी नगरपंचायत भिसी येथे जनतेला भेटण्यासाठी दिवस व वेळ ठरविण्याचे आदेश करावे, नागरिकांच्या अर्जावर कधीच विचारलं केला जात नाही व मुख्याधिकारी मॅडम कधी भेटल्या व काही प्रश्न विचारीले असता पोलीसाची धमकी देतात त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

भाऊराव ठोंबरे शिवसेना पक्ष चिमूर विधानसभा क्षेत्र समन्व्यक व नागरिक भिसी नगर पंचायत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]