वणराच्या पिल्लू ला वनविभाग व स्वाब संस्थेच्या वतीने मिळाले जीवदान.तलोधी(बा.);
      वाणराच्या एका जखमी पिल्याला  बेहोशी च्या अवस्थेत वनविभागाच्या वतीने रेस्क्यू करून आणल्यानंतर शिंदेवाही येथील गुरांच्या दवाखान्यात नेऊन त्याच्यावर डॉ.शालीनी लोंढे यांच्या हस्ते उपचार करून त्यानंतर त्याला दोन दिवस पर्यंत वन विभागामध्ये ठेऊन केळी, ग्लुकोज, दुध पाजून सुदृढ आणि निरोगी करून नंतर परत तपासणी करून घेतली व नंतर त्याचे कळपाला शोधून त्याला सुखरूप सोडण्यात आले. यावेळी त्याची आई जवळ येऊन त्याला कुरवाळले, व संपूर्ण वानरांचा कळपाने त्या चिमुकल्या पिल्लू चे स्वागत केले आणि सोबत घेऊन गेले.                             यावेळी तळोधी बा. वनपरिक्षेत्रातील हेटी बिट चे वनरक्षक श्री भरने, वन कर्मचारी पाल, स्वाब संस्था चे, जिवेश सयाम, यश कायरकर, आकाश मेश्राम, नितीन भेंडाळे, विकास लोनबले, हितेश मुंगमोडे हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]