लटारी नागो पारखी यांना भावपूर्ण आदरांजली लटारी पाटलांचे सेवा मंडळासाठी दिलेले योगदान न विसरणारे - बंडोपंत बोढेकर


 

   

चंद्रपूर (प्रतिनिधी)-
    श्रीगुरुदेव सेवा मंडळ अडेगाव (झरीजामनी) जि. यवतमाळ चे ज्येष्ठ सदस्य लटारी नागो पारखी यांचे गेल्या दि.२७/८/२०२३ रोजी वृद्धापकाळाने अडेगाव येथे दुःखद निधन झाले.मृत्युसमयी त्यांचे वय ८३ होते.त्यांची तेरवी परिवाराचे वतीने दि.१०/९/२०२३ रोजी करण्यात आली.
       राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे सन २००७ मध्ये ( पाचवे - राज्यस्तरीय )राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य विचारकृती संमेलन अडेगाव झरीजामनी येथे घेण्यात आले होते. या संमेलनाच्या आयोजन समितीचे ते सक्रिय सदस्य होते. 
अडेगाव येथे श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या स्थापन करण्यात व राष्ट्रसंताचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. परमहंस बाजीराव महाराज यांच्या सेवेत ते सदैव असत. या गावातील आध्यात्मिक विचारांचे व्यक्तीमत्व तथा आनंददायी सेवाश्रमाचे प्रमुख दिवंगत हरिदास पाटील मासिरकर यांचे ते सच्चे कार्यकर्ते होते.
     अडेगाव आश्रम चे संत बाजीराव महाराजाच्या प्रेरणेने ते अनेक गावात ग्रामगीता वाचन प्रबोधन करीत असे. व्यवसायाने ते शेतकरी होते.
    त्यांच्या निधनाने  राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे महत्त्वाचे व्यक्तिमत्व कायमचे निघून गेले आहे. त्यांच्या कार्यस्मृती आणि श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या दिलेले योगदान न विसरणारे असल्याचे ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी आदरांजली अर्पण करतांना म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]