मुल येथे तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा संपन्न PM Poshan Ahar Compititionपंचायत समिती मुल अंतर्गत नवभारत कन्या विद्यालय मुल येथे नुकतेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पाककृती स्पर्धा संपन्न झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मूल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ. वर्षां पिपरे होत्या . स्पर्धेचे उद्घाटन उपकेंद्र गडीसूर्लाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सरला रंगारी यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मारोडा बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारीजयश्री गुज्जनवार, नवभारत कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अशोक झाडे, नवभारत कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार, पब्लिक पंचनामाचे संपादक विजय सिद्धावार, पत्रकार अमित राऊत, धर्माजी सूत्रपवार, सतिश राजूरवार उपस्थित होते.
या स्पर्धेला परीक्षक म्हणून पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी सुधाकर खांडरे माॅऊंट कॉन्व्हेंटच्या प्राचार्या श्रीमती आर. एस. कांबळे, चंद्रचूड विद्यालय चिखलीच्या मुख्याध्यापिका श्रीमती ए.जी. येलमूलवार यांनी काम पाहिले. मारोडा केंद्राचे केंद्रप्रमुख प्रमोद कोरडे यांचेसह सर्व केंद्र प्रमुख, सर्व विषय साधन व्यक्ती मुल यांच्या उपस्थितीमध्ये पाककला कृती स्पर्धा संपन्न झाली.
कार्यक्रमांमध्ये सध्याच्या युगामध्ये जंक फूड खाण्याची सवय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम दिसून आला. शासनाचे याची दखल घेऊन विद्यार्थ्यांची आरोग्य उत्तम राहण्यासाठी तृणधान्याचे महत्त्व पटवून त्यांच्या विविध पाककलाकृती तयार करण्याची स्पर्धा तालूकास्तरावर स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेत शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना पूरक आहार पुरवणाऱ्या मदतीस व स्वयंपाकी तसेच शिक्षकांनी सुद्धा स्वतः तृणधान्यापासून तयार केलेल्या अनेक पाक कलाकृती तयार करून सजविले होते. स्पर्धेत 13 शाळांनी व शिक्षिकांनी सहभाग नोंदविला
या स्पर्धेत प्रथम क्रमांक नवभारत विद्यालय मुल, द्वितीय क्रमांक नवभारत कन्या विद्यालय मुल, तर तृतीय क्रमांक जि.प. प्राथमिक शाळा सुशी यांनी पटकाविला. स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे 5000/-,  3000/-, 2500 रुपये बक्षीस देण्यात आले. विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.   कार्यक्रमाचे संचालन  आनंद गोंगले  यांनी मानले तर आभार प्रदर्शन सुर्यकांत चटारे यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वी साठी शालेय पोषण आहार समन्वयक विनोद देशकर  व सर्व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी शिक्षक,मुख्याध्यापक यांनी तसेच शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या स्वयंपाकी व मदतनीस यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]