जेसीआय बल्लारपूर वुड सिटी क्लब 14 पुरस्कारांनी सन्मानित
 बल्लारपूर :-(धनंजय पांढरे )जेसीआय क्लबच्या झोन 13 चे वार्षिक अधिवेशन नुकतेच नाशिक येथील स्वामीनारायण हॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते.

ज्यामध्ये राजुरा ते मुंबई येथील शेकडो जे.सी.आय क्लबचे सदस्य सहभागी झाले होते.

ज्यामध्ये वर्षभरात केलेल्या सामाजिक कार्याचा विचार करून पुरस्कार देण्यात आले.

ज्यामध्ये जेसीआय क्लब बल्लारपूरचे अध्यक्ष भावेश चव्हाण यांनी 14 पारितोषिके व 10 प्रमाणपत्रे मिळवून बाजी मारली.

तसेच वार्षिक अधिवेशनात
 अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये फोटो डिस्प्लेमध्ये जेसीआय बल्लारपूर वुड सिटीला प्रथम क्रमांक मिळाला.

क्लबचे अध्यक्ष भावेश चव्हाण यांनी या यशाचे श्रेय आपल्या संघातील सर्व सदस्यांना दिले व सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]