स्वाब' संस्थेतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 37 रक्तदात्यांनी केले रक्तदान.             'स्वाब नेचर केअर' संस्थेने पोलीस विभाग व वन विभागाला सोबत घेत दिनांक 4 ऑक्टोंबर ला सावरगाव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले. यावेळेस परिसरातील 37 रक्तदात्यांनी रक्तदान केले.      
              सावरगाव- तळोधी परिसरातील बहुतेक पेशंट हे ब्रह्मपुरीलाच दवाखान्यामध्ये जात असतात, व तिथे रुग्णांना रक्तांची सतत ची आवश्यकता व त्यांची गरज लक्षात घेत ब्रह्मपुरी येथील  जिवन ज्योती रक्तपेढीला रक्त पुरविण्यात आले. 

         पर्यावरण संरक्षणासाठी 'प्लास्टिक मुक्त पर्यावरण अभियान' शाळा कॉलेजमध्ये 'पर्यावरण साप व वाघ' बद्दलचे मार्गदर्शन शिबिर,  जंगलालगतच्या गावात आरोग्य शिबिर, व रक्तदान शिबिरांचे आयोजन ही स्वाब संस्था गेल्या सात-आठ वर्षापासून करत आहे. व शासकीय यंत्रणा पोलीस विभाग व वन विभागाला सतत सहकार्य करणाऱी ही संस्था आपल्या या रक्तदान शिबिरात दोन्ही विभागाचे नाव सहभागी करून रक्तदान शिबिराचे आयोजन करते. याच शिबिरांद्वारे सतत गडचिरोली, चंद्रपूरच्या शासकीय रुग्णालया करीता या मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठा करण्यात येतो.मात्र शिबिरात रक्त दिलेल्या प्रत्येक रक्तदात्याला व त्याच्या परिवारातील किंवा मित्र परिवारातील कुणालाही व इतर गरजू व्यक्तींना आवश्यकता पडल्यास संस्था द्वारे केव्हाही एका फोनच्या कॉलवर  मोफत मध्ये तात्काळ रक्त पोचविला जातो. 


         आज केलेल्या 37 रक्तदात्यांमध्ये कविता कायरकर या महिलेने सुद्धा रक्तदान केले. यावेळेस संस्थेच्या उपस्थित सदस्यांनी सुभाष गजबे,भारत चुनारकर या पत्रकारांनी व इतर मित्र परिवारांनी रक्तदान केले. या वेळी जिवन ज्योती रक्तपेढी द्वारे डॉ. अनिल नामपल्लीवार, सुप्रिया,मयुरी, लोकेश, दिनेश यांनी रक्तगट तपासणी, रक्त संकलन केले.   शिबिराचे उद्घाटक म्हणून तळोधी (बा.) चे ठाणेदार मंगेश भोयर व उत्तम जी मुंगमोडे, प्राध्यापक अहेरी हे होते.


         रक्तदात्यांना यावेळेस प्रमाणपत्र टिफिन बॉक्स व प्रोटीन , केळी,  चहा व नाश्ता देण्यात आला. व या वेळी संस्थेला रक्तपेढी द्वारे टॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. स्वाब संस्थेचे संपूर्ण सदस्य उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]