अंगणवाडी केंद्र येसगाव येथे पोषण महा अभियानाचे विविध उपक्रमाचे आयोजन

अंगणवाडी केंद्र येसगाव येथे पोषण महा अभियानाचे विविध उपक्रमाचे आयोजन  

                     
एकात्मिक बाल विकास सेवा योजना मुल सर्कल भेजगाव अंगणवाडी अतंर्गत येणाऱ्या अंगणवाडी केंद्र येसगाव क्र. 1,2 येथे पोषण महा अभियानाचा उद्घाटन सोहळा दि. 27/09/2023 ला पार पडला त्यामध्ये पोषण महा अभियानाचा पोषण रँली, सायकल रॅली, आहार प्रात्यक्षिक प्रदर्शनी, गरोदर मातेचे आहार, प्रचार प्रसिद्धी तसेच लोकांमध्ये जनजागृती विविध उपक्रम घेऊन सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सै. शैला ताई आवळे परवेक्षीका सर्कल भेजगाव तर उद्घाटक म्हणून लाभले राजभाऊ कोसरे पोलीस पाटील येसगाव, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे समुदाय आरोग्य अधिकारी कल्याणी पाल मँडम उपकेंद्र भेजगाव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रफुल भाऊ वाकडे जिल्हा परिषद शाळा येसगाव, दिव्य शक्ती ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ. मृगनैनी मारोती वाढई, आरोग्य सेविका सौ. सुष्माताई  शिरभये जिल्हा परिषद शाळा लडके मँडम यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात आहार प्रात्यक्षिक प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा पार पाडत सुदृढबालक स्पर्धा घेऊन मुलांचे स्वागत करुण त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा परवेक्षीका शैला ताई आवळे या प्रास्ताविक करतांना म्हणाल्या महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे 1सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2023हा महिना पोषण महा अभियान म्हणून साजरा करण्यात येत आहे त्यामध्ये महिला, किशोरवयीन मुली, व बालके यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कुपोषणाचे प्रमाण कमी करणे, किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता, व इतर महिलामध्ये रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे. संस्थात्मक प्रसुती, आहार ,आरोग्य, स्वच्छता, तसेच नवजात बाळाची काळजी व देखभाल, सहा महिन्यापर्यंत निव्वळ स्तनपानाचे महत्त्व, गरोदर पणामध्ये घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी मँडम यांनी गरोदर मातेची नोंदणी, महिन्यातुन एकदा आरोग्य तपासणी, 0-5वर्ष वयोगटातील बालकांना लसीकरणाचे महत्त्व, तसेच गरोदर माता, किशोरवयीन मुली याच्यांतील एँनेमियाचे प्रमाण कमी करणे, व संस्थात्मक प्रसुती याविषयी मार्गदर्शन केले. तसेच पोषण महा अभियानाचा मुख्य उद्देश हाच आहे की, कुपोषण निर्मुलन करणे, मुलीच्या जन्माचे स्वागत करणे, अंगणवाडीच्या माध्यमातून समाजात आहार आरोग्य, स्वच्छता घराघरात पोहचवून जनजागृती करणे. आहार प्रात्यक्षिक मध्ये विविध प्रकारच्या पाककृतींचे प्रदर्शन करण्यात आले. पोषण भी पढाई भी, बेटी बचाओ बेटी पढाओ या सारख्या घोषवाक्यातुन लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मालता वाढई यांनी केले तर आभार प्रदर्शन शितल वाढई यांनी केले यावेळेस अंगणवाडी सेविका, मदतनीस,आशा स्वयंसेविका, गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुली, व गावातील ईश इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]