गावकऱ्यांनी हानुण पाडला " उपोषणाचा" डाव.(तळोधी मधील विविध संघटनांचा पोलीस विभागाला साथ.)
तळोधी बा.परिसरात दादागिरीला वाव नाही.

तळोधी (बा.) 
          नागभिड तालुक्यातील तळोधी (बा.) पोलिस स्टेशन मधील समाविष्ट बेचाळीस गावांत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असुन याला ठानेदाराचा आशिर्वाद असल्याचा आरोप चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथिल अजित सुकारे यांनी केला असुन  मत्र्यांपासुन तर वरिष्ठ अधिकाऱ्यां पर्यंत तक्रार करून उपोषणाचा बसण्याचा प्रयत्न केला असता. आज तळोधी परिसरातील पोलिस पाटील संघटना, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, पत्रकार संघटना व जेष्ठ नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांना निवेदन देऊन परिसरातील शांतता भंग करत, तळोधी बा. गावाला जाणून बुजून इतरत्र बदनाम करण्याचा कट रचनार्या, स्वतः मुजोरी ने पोलीस स्टेशन आवारात उपोषणाला बसण्याची धमकी देनार्या अजित सुकारे यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले आहे.
 निवेदनातून केलेल्या मागणीनुसार तळोधी पोलिस स्टेशनमध्ये ठानेदार मंगेश भोयर रूजू झाले तेव्हापासुन तळोधी पोलिस स्टेशन मधील अवैध धंद्यांवर अंकुश लागल्याचे नागरिकांचे म्हणने असुन अवैध दारू, वाळू, सट्टा मटका, जुगार, एकतंरीत तळोधी परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कार्य ठानेदार मंगेश भोयर यांचें कार्यकाळात सुरू असुन एक कर्तव्यदक्ष ठानेदार म्हणून गैरवाण्यात येतं असुन सुध्दां व्देषभावनेतुन चिमुर तालुक्यातील मोटेगाव येथील अजित सुकारे यांनी ठानेदाराचे विरोधात प्रसारमाध्यमांतून व निवेदनाव्दारे निलंबनाची मागणी करत तळोधी परिसरातील शांतता व सुव्यवस्था भगं करण्याचे काम अजित सुकारे करीत असुन, 
त्यांचेवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पोलीस उपअधीक्षक चंद्रपूर यांना देण्यांत आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
   जिल्हाभरात व इतरत्र सुद्धा तळोधी गावाची व तळोधी पोलीस स्टेशनची खूप बदनामी होत असून या परिसरात कायदा सुव्यवस्था नसल्याचे चित्र या भामट्याने लोकांसमोर उभे केले आहे. तसेच प्राप्त माहितीनुसार हा व्यक्ती अवैध व्यवसाय करणाऱ्यांशी साठ गाठ करून तुमचे बंद असलेले व्यवसाय हा इन्स्पेक्टर गेल्यानंतर मी स्वतः चालू करून देतो आणि याची बदली झाल्यानंतर संपूर्ण पोलीस स्टेशन माझ्याच सल्ल्याने चालेल असे सांगत अवैध व्यवसायिकांची साथ मिळवण्याचा प्रयत्न व पैशाची मागणी करत उपोषणाच्या नावाखाली वसुली करुन पोलीस स्टेशन परिसरामध्ये उपोषणाला बसण्याचा प्रयत्न करून ठाणेदार व तळोधीची सुरळीत चाललेली कार्यपद्धती विस्कळीत करण्याचा या व्यक्तीद्वारे प्रयत्न होत आहे. त्यामुळे गावातील नागरिक, तसेच तळोदी पोलीस स्टेशन हद्दीतील संपूर्ण पोलीस पाटील, पत्रकार हे एकवटून या भामट्याचा 'नाटक वजा उपोषणाचा' डाव लोकांनी  हाणून पाडीत त्याचेच विरुद्ध जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन दिले आहे.
     यावेळी निवेदन देतांना पोलिस पाटील संघटनेचे रविंद्र बोरकर, सचिव दौलत मस्के, मधूकर घुग्गसकर, विनोद सयाम, अपुर्वा मेश्राम, शिला नेवारे, शितल इजकापे, जीवन बोरकर, राजेंद्र सडमाके, हितेश घुग्गसकर, जागूती बोरकर, लता लांडे,लिपिता गुरनुले, सुरेशं सडमाके, तळोधी बा.चे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन मदनकर, आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]