सावरगावात अंगणात येऊन बिबट्याने केली गाईची शिकार.

सावरगावात अंगणात येऊन बिबट्याने केली गाईची शिकार.
यश कायरकर,
          तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या तळोदी बीटातील सावरगाव येथे  पुनाराम गेडाम यांच्या अंगणात बांधलेल्या गाईला रात्री बिबट्याने ठार केले. ही बाब सकाळी घरचे उठल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आली.
           या घटनेची माहिती मिळताच तळोधी बाळापूरचे अतिरिक्त कार्यभार असलेले वनरक्षक राजेंद्र भरने यांनी मोक्कास्थळी येऊन मोक्याचा पंचनामा केला व गायीला घराशेजारीस खड्डा करून पुण्यात आले. व संबंधित वन्य जीवावर लक्ष ठेवण्याकरिता घटनास्थळी तीन कॅमेरे लावण्यात आले.
     विशेष म्हणजे घटनास्थळ हा नागपूर मुल  - हायवे ला लागून असलेल्या घरी हायवे पासून अवघ्या दहा मीटर अंतरावरच आहे. आणि बिबट्याने गावात, अंगणात येऊन गाय ठार मारल्यामुळे परिसरात व गावात भीती निर्माण झालेली आहे. त्यामुळे वन विभागाने याकडे लक्ष द्यावे असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]