तळोधी बा.पोलीसांची कार्यवाही,अवैध रेतीचा ट्रॅक्टर केला जप्त.
तळोधी बा : 
            येथील पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाढोणा परिसरातील गावात रात्री च्या वेळेस तळोधी बा.पोलीस स्टेशनचे हवालदार प्यारेलाल बांबोळे, पोलिस शिपाई दिलीप चौधरी व होमगार्ड पोलीसांकडून चेंकीग सुरु असताना गुप्त माहितीच्या आधारे मौजा वाढोणा येथे बोकोडोह नाल्यातून चोरीच्या माध्यमातून अवैध रेती भरलेला ट्रॅक्टर क्र.MH-34 BG-0698  (मेसी फर्ग्युसन) कंपनी चा ट्रॅक्टर ला अडवून वाहनांची तपासणी केली असता कुठल्याही प्रकारचे रेती परवाना नसल्याने पोलीसांनी ताब्यात घेतले.व वाढोणा येथील अवैध रेती ट्रॅक्टर सहित 3.40000 रूपये किंमतीचे माल जप्त केला.
 हा ट्राक्टर  संजय  गहाने त्यांच्या मालकीच्या असल्याने त्यांचे वर कलम 379 नुसार कारवाई करुन गुन्हा दाखल करण्यात आला.
      अवैध व्यवसाय बंद करण्याची मागणी करणाऱ्या जवळच्या व्यक्तिनेच माहिती  पुरवल्यामुळे ही कारवाई करण्यात पोलिसांना यश आल्याचे चर्चेत आहे. पुढील तपास तळोधी बा.पोलीस स्टेशन चे ठाणेदार मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी रत्नाकर देहारे करीत आहे.अवैध रेती धारकांवर कारवाई केल्याने तस्करी धारकांचे धाबे दणाणले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!

राजुरा

[राजुरा][stack]

मूल

[मूल][grids]

चिमूर

[चिमूर][grids]